अशी ही अन्नपूर्णा !!

अन्न हे पूर्णब्रह्म !!अशी ही अन्नपूर्णा!!

अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो.ते खरेच आहे.माणसाच जगन हे पूर्णता त्याला मिळणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून असते .आपल्याला ही ऊर्जा अन्नातून मिळते .दोन वेळच पोटभर जेवन माणसाला सुदृढच बनवीत नाही तर त्याला शांती देते,समाधान देते,जीवनाला बळ देते.म्हणून माणसाच्या आत्माला शांत करायचा दरवाजा थेट जिभेजवळ जातो .पूर्वीच्या काळात माणूस दोन वेळच्या अन्नाची भूक चटणी भाकरीवर भागवायचा.सन,उत्साह,विवाह आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुंचार म्हणून घरात गोडधोड सिजायच.त्यात पारंपारिक पक्वाने केली जात.दिवाळी,दसरा,होळी,पोळा या सनाला घरातील स्त्रियांच्या पक्वानाला आठ दिवसापासून सुरुवात व्हायची.घरात पदार्थ्यांचा सुगंध दळवळायचा.पाहुण्यांची वरदळ राहायची.दिवाळीच्या फराळ करायच्या निमित्याने गावतील पाहुण्यांना मानाने बोलावल्या जायच त्यानिमित्याने बालपणाच्या मैत्रिणींचा माहेरी आल्या की एकमेकांशी भेट व्हायची .एकमेकांची सुखदुःख त्यानिमित्याने वाटली जायची.म्हणून दिवाळीला माहेरी जायची आतुरता,मामाच्या गावाला जायची उत्सुकता मुलांना असायची . ही सगळी परंपरागत मुल्य आपण बघितली आहे.अनुभवलेली आहे. सनाचा गोडवा नाते सबंधाला जोडून ठेवणारा असायचा.

पण हळू हळू पारंपारिक जीवनशैली पूर्णता बदलेली त्या जागेवर आधुनिक जीवनशैलीची झूल पांघरल्या गेली. सन समारंभ आजही साजरे केले जात नाही असे नाही .पण त्यात पूर्वीसारखा गोडवा राहलेला नाही. कुठुंबाचा आकार आता स्वतःपुरता मर्यादित झालेला दिसतो . दिवाळीच्या गोड,खारड ,तिखट पदार्थावर ताव मारतांना नात्यातील एकमेकांना कायमचा बांधून ठेवणारा गोडवा हरवलेला दिसतो.त्या जागेवर डोळ्याला दीपवून टाकणारी झगमगता,नानाविध फाट्यक्यांची रंगीबिरंगी आतिशबाजी ,फटाक्यांची दणाणून टाकणारे आवाज ,आधुनिक दिव्यानी सजलेली घरे मॉल्स ,रगोळ्यांच्या रंगांनी सजलेला बाजार ,अनेक सामानांनी सजलेल्या बाजाराची आर्थिक कोट्यावधीची उलाढाल हे सगळ बघितल की दिवाळीच्या सनाची बदलती परिणीती आपल्या दिसते.आपण ती अनुभवतो... मग आपल्याला भूतकाळातील त्या गोड आठवणी अंधुक होतांना दिसतात हरवलेले ते दिवस पूर्णता आधुनिक बेगडी वातावरणामध्ये विरून गेलेले दिसतात.मग आम्ही पुन्हा आपल्या आधुनिक दुनियेत वावरायला लागतो.स्वप्नवत खुणावणारे ते दिवस काळाच्या ओघात अदृश्य होतात.

खर तर हा बदल माफक आहे.कारण पूर्वी स्त्रियांच्या हाताला काम नव्हती.स्त्रियांना घरच्या कामात,पदार्थ बनविण्याकरिता वेळ असायचा.दिवाळी सन हा महिन्याभर्याच्या तयारीशी साजरा व्हायचा.सगळे गोड पादार्थ घरी बनविल्या जायचे.मायेच्या हाताची चव काही न्यारीच राहायची.पण आता काळाबरोबर घरच्या कामाची पाऊले मंदावलेली दिसतात.त्यात आता आळस संचारलेला दिसतो.कारणही तसच स्त्री ही घरच्या कामपूरती मर्यादित राहली नाही.ती नोकरी करते.तिला वेळ नसतो.ती मानसिक, शारीरिक ताणतणावातून थकलेली असते. अशा वेळी स्वतःच्या हाताने बनविण्याकरिता तिच्याजवळ वेळही नसतो आणि ती मानसिकता ही नसते.हे वास्तव आहे. अर्थात सगळ्याच नोकरदार महिलांना ते लागू होते अस मी म्हणणार नाही.याला काही स्त्रिया अपवादात्मक पण असू शकतात.

याच नोकरदार मंडळीमुळे बाजारात अनेक खाद्य पदार्थाचे व्यवसाय सुरू झालेले आहेत. घरातील लागणाऱ्या प्रत्येक वस्तू ,पदार्थ आरामात बाजारात मिळतात.ऑर्डर दिली की त्या घरपोच उपलब्ध होतात.त्यामुळे माणसाच आयुष्य हे अधिकच सुखकर झालेल आहे. कारण घरात दळवळणारा सुगंध जरी बाजारात,हॉटेलात दळवत असला तरीही प्रत्येकांच्या जिभेचे चोचले त्याच मार्गाने पूर्ण होतात हे आपण कसे विसरू शकतो? पण घरची चव हॉटेलातील किंवा दुकानातल्या पदार्थाना येणार कशी?

नाहीच येणार ? ती चव चखायची असेल तर त्या चवीला व्यवहाराचा गंध असायला नको, मिलावटीचा स्पर्श असायला नको....त्या पदार्थांना घरगुती मायेचा गोडवा असायला हवा..घरगुती साजूक तूपाचा सुगंध असायला हवा ! जिभेच्या चवीच समाधान असायला हव!आणि ते फक्त आणि फक्त मायेनी बनविलेल्या पदार्थातूच मिळू शकतो.

असाच सुगंध दळवळतो तो ' अन्न पूर्णब्रहा ' पदार्थात....त्यांच्या पदार्थातून घरगुती चवीचा गोडवा जाणवतो.हे सगळ सांगावस वाटत कारण दिवाळी पुढे आहे.एका अन्नपूर्णा मैत्रीनीशी अशीच भेट झाली .जी मला स्वयंपूर्ण अन्नपूर्णा देवीसमान भासते.ज्यांनी आपल्या स्वादिष्ट पक्वानांची समाजात वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे.ख्याती निर्माण करून स्वतःला आत्मनिर्भर केलेलं आहे.आपली आवड जोपासत त्यातून व्यवसाय साधत त्यांनी यशस्वितेची उंच उंच झेप घेतली आहे.आपल्या ध्येयाच्या परिपूर्ततेने आपल्या स्वप्नांच इंद्रधनुष्य फुलवलेल आहे.जी अनेकांच्या स्वप्नाना आकार देऊ शकते. ध्येय साकार करणाऱ्या , झेप घेऊ इच्छिणाऱ्या रणरागिणीच्या पंखाला ऊर्जा देऊ शकते,बळ देऊ शकते. अन्नपूर्णाची हाताला चव असणाऱ्या स्त्रियांना रोजगारची प्रेरणा देऊ शकते.एक शशक्त स्त्री म्हणून आपली समाजात नवी ओळख निर्माण करू शकते.

म्हणून सधन घरामध्ये जन्म घेतलेलेल्या या अन्नपूर्णेचा मला परिचय द्यावा वाटतो.तीचे नाव अर्चना , जन्म १९८० वयाच्या १८ वर्षी प्रेमविवाह.. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष ...पण म्हणतात ना मनात जिद्द,ध्येयपूर्ण करण्याची ऊर्मी असली तर जगात अशक्य हे काहीच नाही. स्वप्नांचे पंख लावून यशाचा क्षितिज नक्कीच गाठता येऊ शकतो.अशीच झेप घ्यायला अर्चनाने सुरुवात केली. लग्नानंतर बी ए व नंतर अर्थशास्त्रामध्ये एम ए केल.आपली शैक्षणिक उन्नती साधली...माहेरसारख सासरही साधन कुटुंबातील असल्यामुळे घरी सुखसोईचे सर्व साधने उपलब्ध.. एक मोठ घर,घरापुढे चारचाकी उभी असतांना माणसाला अजून काय हव ?पण नाही तिचे स्वप्न कुठल्यातरी झेपावत होते. तिला ती स्वतःची काही वेगळी ओळख निर्माण कारण्याकरिता खुणावत होती . ती आपल एक स्वतंत्र विश्व निर्माण करायला एक एक पाऊल पुढे टाकत होती .स्वतचा छंद,आवड जोपासायची तिने स्वतःला सवड दिली होती .त्यातूनच तिला तीच अस्तित्व साकारायच होत . स्वतच्या अस्तित्वाची ओळख करून ध्यायची होती.आणि तिने ते साकारल.तिच्या शैक्षणिक जीवनात ती स्वछंद होती स्विमिंग ,मलखांब ,बॅटबिंटन अशा अनेक खेळात निपुण होती. त्यामुळे ती त्यात प्रवीण होती. तोच छंद जोपासत 'प्रवेशिका' आणि 'प्रवीण' या दोन परीक्षा 'जनार्धन स्वामी प्रयोग अभ्याशी मंडळ'. मधून तिने पास केल्या होत्या . आयुष्याच्या यशस्वितेकडे घेऊन जाणार ते तीच पाहील पाऊल होत.सुरुवातीला योगा व जिम प्रशिक्षक म्हणून कामाची सुरुवात केली.तोच पॉइंट तिच्या आयुष्यात दिशदर्शक ठरला .एकदा ती घरी बनविलेले पदार्थ घेऊन तिथे गेली.तेव्हा तिथे असणाऱ्या मैत्रिणीनी तिच्या बनविलेल्या पदार्थांची खूप स्तुती केली.तुझ्या हाताला फार चव आहे. तू यापुढे पदार्थ्याचे ऑर्डर घेत जा अशा त्या म्हणू लागल्या. यातूनच तिला गृहउद्योगाची चालना मिळाली.आपला घरच्या घरी एक छंद म्हणून जोपासलेली आवड आपला एक व्यवसाय होईल याची कल्पनाही तिने कधी केली नसतांना तिच्या प्रयत्नाला यश मिळत होते.पदार्थ बनविण्याचा वारसा आईपासून घेत तिने जी पदार्थ बनवण्याची कला साधली होती. ती अमौलिक होती .प्रत्येकाच्या हाताला ती चव नसतेच.नोकरीदार स्त्रियांना घरच्या चवीची जी ओढ असते . ती अर्चनाच्या बनविलेल्या प्रत्येक पदार्थामधून मिळू लागली .तिच्यात अंगभूत असलेले कौशल्य आज आकार घेऊ लागल होत.मन ओतून केलेले पदार्थ अधिकच रुचकर,स्वादीष्ट होऊ लागले ते अनेक ग्राहकाला मनापासून आवडायला लागले.यातून आज तिने यशाची उत्तुंग घेप घेतलेली आहे.

या व्यवसायातुन आपण इतक काही मिळवू शकू याची कधी कल्पना केली नसतांना ती उत्पनाची एक एक पायरी गाठू लागली.'अन्न पूर्णबम्ह ' या नावाने सुरु केलेला व्यवसायाची सुरुवात तीन हजारापासून झालेली असतांना आज चाळीस ते पन्नास हजाराचा मासिक नफा ती कमवत आहे."घरच्या घरी राहून आपण आपले दडलेले कौशल्य जोपासू शकतो;कुठलेही व्यवसाय सुरू करू शकतो फक्त आपली इच्छाशक्ती ही प्रगल्भ असायला हवी!"अशा त्या मनापासून आवर्जून सांगतात.अर्थात प्रत्येक यशामागे मेहनत आहे .सातत्याचा ध्यास आहे .एक अनामिक ऊर्मी आहे.हे निश्चितच विसरायला नको.

आपल्या यशस्वितेच गमक सांगतांना त्या म्हणतात हा व्यवसाय पोटाची आवड पूर्ण करणारा आहे.त्यामुळे लोकांना केमिकल मुक्त, भेसळमुक्त मुक्त पदार्थ हवे असतात.त्यामुळे तीच आवड लक्षात ठेऊन शुद्ध तेलाचा तूपाचा वापर केला जातो.ग्राहकाच्या आरोग्याची काळजी घेतांना पदार्थ ताजे आणि ऑर्डर घेवून बनविल्या जातात.कुठलेही साठवलेले पॅकिंग पदार्थ विकल्या जात नाही.प्रत्येक सिजनवार पदार्थ केले जातात.त्यात उन्हाळ्यात पापड,शेवाया,लोणचे,साडया,तिखट,गरम मसाला हे पण ऑर्डर नुसार बनविल्या जातात.तसेच प्रत्येक सन उत्सवाप्रमाणे प्रचलित असणाऱ्या पदार्थांचे ऑर्डर घेतले जातात.त्यात करंजी,मोदक,पुरणपोळी पासून अनेक पारंपारिक पदार्थापासून ते आधुनिक पदार्थापर्यंतचे ऑर्डर घेतले जातात.येवढेच नाही तर जेवणाचे सुद्धा ऑर्डर घेतल्या जातात.अर्थात ऑर्डरची द्खल घेण्याकरीता सोशल मीडियाचा वापर केल्या जातो .त्यामुळे एकदा ग्राहकाला 'अन्न पूर्णब्रह्म' चे पदार्थ चखायला मिळाले की ग्राहकांची ऑर्डर तुटत नाही त्यामुळे आता अन्न पूर्णब्रह्म ची प्रसिद्धी करायला कुठल्याही जाहिरीतीची,कुठल्याही दुकानाची गरज नाही.आता त्यांचा हा व्यवसाय गगनाला जाऊन भिडला आहे.आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून प्रख्यात आहे.आपल्या यशाचे खरे मानकरी ते आपल्या मिस्टरांना ,मुलाला आणि सासूबाईला देतात.मुलगा उच्च पदावर ,मिस्टरांना सरकारी नोकरी ,सासुबाई रिटायर्ड शिक्षिका असतांना मला मझा छंद जोपासायला या व्यवसायामध्ये कुठलीही कमीपणा न जोपासता त्यांनी मला जे सहकार्य केल त्यामुळे मी आज ही झेप घेऊ शकले हेही त्या स्वाभिमानाने सांगतात.आज त्यांचे ऑर्डर फक्त नागपूर पुरते मर्यादित न राहता पुणे,मुंबई आणि फॉरेन पर्यंत पोहचलेले आहेत.एका शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या यशस्वी उद्योजिका ठरल्या आहे.आपण त्यांना आदर्श म्हणून बघू शकतो.त्यांचा हा व्यवसाय एक पैसा कमविण्याच साधन नसून त्या तो एक छंद जोपासतात .आपल्याला यातून आत्मिक सामाधान,आनंद मिळतो . आज त्यांचा हा व्यवसाय त्यांच्यापूरता मर्यादित न राहता त्यांनी दोन ,तीन महिलांना आपल्याच व्यवसायात रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.खरच अशा महिलांचा आज सन्मान व्हायला हवा!

समाजात अशा अनेक स्त्रिया आहे ज्यांच्यात अनेक कलागून लपलेले असतात.पण ते कौशल्य पणाला लावून मेहनत घेण्याची ऊर्मी त्यांच्यात नसते.अनेक कलांची गळचेपी अशीच होत असते.अनेक कला अशाच आतल्या आत गुदमरल्या जातात. अनेक स्त्रिया नोकरीच्या मागे धावतांना दिसतात.पण आपल्यात लपलेली कला त्यांना शोधता येत नाही.त्या कलेला आकार देण्याचा प्रयत्न करीत नाही. स्त्री आत्मनिर्भर झालीच पाहिजे.असे फक्त नारे देऊन भागणार नाही, फक्त महिला जागतिक दिन साजरे केल्यानी होणार नाही ,तर ती स्वयंपुर्ततेणे घडली पाहिजे.आपल्या अस्तित्वाला एक नवी ओळख देऊ इच्छिनारी असली पाहिजे .ती अनेक सुंदर कलाकृती साकारू शकते.शिवनकला ,ला साहित्यातकला ,शिल्पकला ,चित्रकला अशा अनेक कला जोपासून ती त्यात व्यवसाय करू शकते.यशस्वी ठरू शकते.मातीतून,गोट्यातून ,साकारलेल्या अनेक कौशल्यातून ती आपल स्वप्न साकारू शकते. प्राचीन काळापासून अशा कलागुंनाला राजाश्रय दिल्या जायचा समाजात अशा कलावंताना बक्षिस दिले जायचे त्यांना प्रोत्साहित केले जायचे.कारण समाज हा अनेक कलांचा आधिपासून भोक्ता आहे..संगीत,चित्र,शिल्प,साहित्य,काव्य,प्रवास वर्णने,स्वादिष्ठ पदार्थ खाण्याची आवड समाज जोपासायचा जो आजचा आधुनिक समाजही जोपासतो.त्यामुळे कलेच्या क्षेत्राला खास करून हाताने बनविलेल्या कलेला आज मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी आहे.

तेव्हा नोकरीच्या मागे न धावता,आपल्या प्राक्तनाला कायम दूषणे न देता,आपल्या नासिबावर कायम न रडता ती कला आपला आधार,आपली ओळख,आपला व्यवसाय कसा ठरू शकेल ? यावर आपण खऱ्या अर्थाने मंथन आणि चिंतन करायला पाहिजे !अर्चनाने तिच्या हाताच्या कलेला,पदार्थाच्या कौशल्याला बाहेर काढत आपली एक ओळख निर्माण केली.तीच ओळख अनेक स्त्रियांनी निर्माण करावी.हाच या लेखणी मागचा

उद्देश आहे.म्हणून अशा अनेक महिलांचा आदर्श ,प्रेरणा घेत आपण आपल्या आयुष्याला नवा आकार द्यावा !नवे क्षितिज गाठायला हवेत!

शेवटी एकच म्हणाव वाटत!

मौजो की कासम,तारो की कसम

ये तानाबाना बदलेंगा

तू खुद को बदल,तू खुद को बदल

तब ही तो जमाना बदलेंगा!

प्रा.वैशाली रितेश देशमुख

फोन नंबर ९०२११७२३६२

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?