राज है जिंदगी बस जिते चले जाओ !
राज है जिंदगी बस जिते चले जाओ ....!! एक अकल्पित रहस्य मानवी जीवनाच्या परिवलनात वास करीत असतो. जे आजपर्यँत कुणीही उलगडू शकलं नाही.म्हणूनच अनेकदा ज्या गोष्टीची आपण कल्पनाही करू शकत नाही त्या गोष्टी नकळतपणे जीवनात घडून जात असतात. त्यामुळे कुणाच्याही जीवनात कधी केव्हा काय घडेल हे सांगता येतं नाही. सुखं समाधाने जीवन जगणाऱ्या माणसाच्या जीवनात दुःखाच ग्रहण कधी कुठून लागेल याचा अंदाज बांधता येतं नाही.अनिश्चिततेच हे सावट कायम आपला पाठलाग करीत असतो.ते केव्हा, कुठे, कधी आपल्याला गुरफटेल हे सांगता येतं नाही. मग एकतर आपण आपल्या नशिबाला दोष देतो. किंवा अनेकांच्या शब्दातून आपल्याला सांत्वना मिळतात, "नशिबात असलेल्या गोष्टी कुणाला टाळता येतं नाही." सारं काही घडत ते अकल्पिच! आता बघाना आपला देश जगाच्या पाठीवर किती गतिशीलपणे विकास करीत होता.सर्व काही सुरळीत सुरु असतांना कोरोना सारखा अदृस्य विषाणूने माणसाच्या जीवनाला व्यापू...