Posts

Showing posts from February, 2021

प्रेम म्हणजे?

शाश्वत प्रेमाची परिभाषा! (वेलेन्टाइन स्पेशल)              शाश्वत प्रेमाबद्दल सांगतांना  'ययाति ' या पौराणिक कादंबरीत  सौदर्यपूर्ण शब्दात वि .स .खांडेकरांनी प्रेमाची खरी परिभाषा उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यात ते म्हणतात," प्रेम माणसाला स्वत:च्या  पलीकडे पाहण्याची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो , मात्र ते खरंखुर प्रेम असायला हवं ! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नये .खरं प्रेम नेहमीच निस्वार्थी असतं ,निरपेक्ष असत; मग ते फुलावरल असो ,प्राण्यांवरल असो ,सृष्टीसौदर्यावरलं असो, आईवडिलांवरलं असो ,प्रियकर किंवा प्रेयसीवरलं असो,कुल ,शांती ,राष्ट्र यांच्यापैकी कुणावरही असो .... निस्वार्थी ,निरपेक्ष ,निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्माच्या विकासाची पहिली पायरी असते असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो."           खरं तर खऱ्या प्रेमाची परिभाषा अशीच असायला हवी...पण बदलत्या आधुनिक काळाबरोबर प्रेमाचीही  परिभाषा बदलत चाललेली आहे. प्रेम हे अकल्पित उत्पन्न होणारी भावना आहे. ती मोजून, मापून, ठरवून करता येत नाही.ती हृद...