आत्मनिर्भरतेचा संकल्प !
आत्मनिर्भरतेचा संकल्प ! जगभरात लक्षावधी लोकांचा बळी घेणारा कोरोना व्हायरस, कधीच संपुष्ठात येणारं नाही, त्यामुळे जगाला आता या विषाणूंसोबतच जगणे शिकावे लागेल. असे संकेत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी नुकतेच व्यक्त केले आहे. त्यानुसार आता सहजासहजी कोरोना संपुष्टात येईल असे वाटतं नाही.सध्याचा कोरोना बळी रुग्णाचा आकडा बघितला तर तो अवाक करणारा आहे. तीन लाखाच्या वर सरकलेला आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पादुर्भावामुळे आणखी किती लोकांचा बळी जाईल हे सांगता येतं नाही. जागतिक पातळीवर कोरोनावर मात करता येईल असा ठोस उपाय अध्यापही गवसलेला नाही. आपण इतिहासाला चाळून बघितले तर संसर्गजन्य रोग यापूर्वीही जगाने अनेकदा अनुभवले दिसून येते . याआधीही प्लेग, देवी, साथीचा ताप, साईन फ्लू अशा अनेक संर्गजन्य रोगाचा पादुर्भावाने जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे . उदाहरण द्यायचे झाले तर. इ. स. 1347ते 1351 या कालावधीत प्लेगच्या साथीमुळे आशिया,युरोप, आफ्रिका या खंडात प...