Posts

Showing posts from September, 2018

शिक्षक हा राष्ट्र उन्नतीचा ठेवा !

   शिक्षक हा राष्ट्र उन्नतीचा ठेवा !        भारताचे पहिले उपराष्ट्र्पती व दुसरे राष्ट्र्पती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण् यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर देशभरात शिक्षक दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो.शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचा, गौरवाचा सन्मनाचा हा दिवस ! आपल्या समृद्ध संस्कृतीच्या जडण घडणीत ज्यांचा सिहांचा वाटा आहे अश्या संस्कृतीच्या रक्षकाच्या कर्तुत्वाला प्रणाम करणारा हा दिवस.ज्याच्या ज्ञानरुपी स्पर्शाने असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन सुवर्णमय होते, अश्या ज्ञानपिपासू व्यक्तिमत्वाचा  गौरवाचा हा दिवस! *गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेवो महेश्वरा गुरु :साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: भारतीय  संस्कृतीत गुरूला परमेश्वरापेक्षाही मोठं स्थान दिल्या गेलं. प्राचीन काळापासून आपल्या महान संस्कृतीला गुरु शिष्य परंपरा लाभली आहे. गुरु आणि शिष्याचं नातं हे निरंतर वाहणाऱ्या नदीसारखंच ! शिक्षकास पूर्वी 'आचार्य ' म्हणतं, आचार्य म्हणजे आचारवान. स्वतः आदर्श जीवन आचरणात आणून विद्यार्थांकडून आचरवून घेणारा तो आचार्य. तर वेदामध्ये गुरूला अत्...