उध्वस्त करणार वादळ!!
उध्वस्त करणार वादळ! कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्व जनजीव न विस्कळीत झालेलं असताना आता हळू आपण सावरायला लागलो.पण या सर्वात मात्र माणसाचं जगणं आणि वागणं बदलून गेलं आहे.कित्येकानी आपले आप्तस्वकीय हरविले.यात कुणाची आई, वडील, भाऊ, बहीण तर कुणाचा एकुलता एक मुलगा... आईवडिलांचं छत्र हरविलेली कित्येक पोरकी मुले... तर नुकतच लग्न झालेल्या मुलींचे हरविलेलं कुंकू.....निष्ठुर नियतीने यात ज्यांना दुःख द्यायचं होत त्यांना कुठेच कसर सोडली नाही. जगण्याचा श्वास हिरवून घेणार असहय दुःख देऊन जाणारा हा काळ म्हणजे एक महाभयान प्रकोपच .... येणाऱ्या दहा पिढ्याना आठवणीत राहील असाच हा काळ आपण अनुभवलेला आहे. आलेला काळ निघून गेला पण माणसाचं जीवन कस क्षणभगूर असते.याच गूढ उकलून गेला.हातातली वाळू निसटून जावी तस माणसाचं जगणं निसटून गेलं... जाणारे डोळ्यात अनेक स्वप्न साठवून गेले...त्यांचे चेहरे अजूनही डोळ्यापुढे येतात...कोरोनाच येणार वादळ आपलं जीवन उध्वस्त करून...