**वेदना मातृत्वाची !!** चार दिवसानंतर सारिकाच लग्न होणार होत.घरात पाहुण्यांची बरीच वर्दळ सुरू होती.घरातील सर्व पाहुणे मंडळी आपापल्या कामात मग्न होते.मात्र सारिकाच्या मनाचे भाव काही वेगळेच होते.ती आपल्या बाळाला मांडीवर घेऊन लळीवारपणे गोंजारत होती.रात्रभर रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते.आताही तिच्या डोळ्याच्या कडा ओलावत होत्या. राहूनराहून तिच उर भरून येत होत .आपल्या चिमुकल्या मोहितला आपण आपल्यापासून नेहमीसाठी दुरावत आहोत.ही अपराध्याची भावना तिला अधिकच अस्वस्थ करून जात होती.आपण मागील जन्मी कुठल पाप केल असाव म्हणून या भोगवाटा आपल्या वाट्याला आल्या असेल;नियती इतकीही निष्ठुर कशी असू शकते.यावर तिचा विश्वास बसत नव्हता.तिच्या मनात अनेक द्वंद्व सुरू होते.अशातच मोहितने तिला प्रश्न केला आणि ती भानावर आली."आई आपल्याकडे कुणाच लग्न आहे गं !" हे ऐकून ती स्तब्ध झाली.आपल्या मुलाला काय उत्तर द्याव ते तिला कळेना.डोळ्यातील अश्रू पुसून तिने मोहितला जवळ घेतले.मोहित अवघ्या पाच वर्षाचा होता. त्याचा तो अल्लड,निरागस चेहरा बघून तिला गहिवरून आल.मोहितने...
Posts
ऐसे कैसे झाले भोंदू…!!
- Get link
- X
- Other Apps
**ऐसे कैसे जाले भोंदू ..!!** **संत सज्जन दिसतील जेथे ; लाटांगने जावे तेथे**... असे आपले संत सांगून गेलेत , पण ते संत अखंड विश्वशांतीसाठी जप करणारे होते.मानवतेचे मंत्र देणारे होते , स्वत:च ऐहिक सु:ख सोडून मानवतेच्या सेवेसाठी जीवन अर्पण करणारे होते .पण ही मानवसेवा कलंकित करून अध्यात्माच्या नावाखाली ढोंगी,पाखंडी,स्वार्थी भोंदू बाबांची गर्दी समाजात वाढलेली आहे. अशाच एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कोट्याधीश विकृत बाबाच म्हणजे अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणार आणि कलंकित करणार ठरलेल आहे. त्याच्या विकृतीचा कळस असंख्य मानवजातीला शरमेने मान खाली करायला लावणार आहे.खर तर आपल्या देशात ही घटना काही नवीन नाही.याआधी आसाराम बापू प्रकरण,रामरहीम प्रकरण हे सुद्धा धक्कादायक होते.त्याचीच ही पुनरावृत्ती झाली आहे. महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदू बाबांना जेलची हवा खावी लागली . अध्यात्वाच्या दुवा पुढे ठेऊन दुकानदारी चालवणाऱ्या या विकृत बाबांनी असंख्य महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले.अनेक महिलांचे घेतले आहे . असले किळसवाने क...
अशी ही अन्नपूर्णा !!
- Get link
- X
- Other Apps
अन्न हे पूर्णब्रह्म !!अशी ही अन्नपूर्णा!! अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो.ते खरेच आहे.माणसाच जगन हे पूर्णता त्याला मिळणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून असते .आपल्याला ही ऊर्जा अन्नातून मिळते .दोन वेळच पोटभर जेवन माणसाला सुदृढच बनवीत नाही तर त्याला शांती देते,समाधान देते,जीवनाला बळ देते.म्हणून माणसाच्या आत्माला शांत करायचा दरवाजा थेट जिभेजवळ जातो .पूर्वीच्या काळात माणूस दोन वेळच्या अन्नाची भूक चटणी भाकरीवर भागवायचा.सन,उत्साह,विवाह आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुंचार म्हणून घरात गोडधोड सिजायच.त्यात पारंपारिक पक्वाने केली जात.दिवाळी,दसरा,होळी,पोळा या सनाला घरातील स्त्रियांच्या पक्वानाला आठ दिवसापासून सुरुवात व्हायची.घरात पदार्थ्यांचा सुगंध दळवळायचा.पाहुण्यांची वरदळ राहायची.दिवाळीच्या फराळ करायच्या निमित्याने गावतील पाहुण्यांना मानाने बोलावल्या जायच त्यानिमित्याने बालपणाच्या मैत्रिणींचा माहेरी आल्या की एकमेकांशी भेट व्हायची .एकमेकांची सुखदुःख त्यानिमित्याने वाटली जायची.म्हणून दिवाळीला माहेरी जायची आतुरता,मामाच्या गावाला जायची उत्सुकता मुलांना असायची . ही सगळी परंपरागत मुल्य आपण बघितली ...
अन्न हे पूर्णबम्ह!!
- Get link
- X
- Other Apps
अन्न हे पूर्णब्रह्म !!अशी ही अन्नपूर्णा!! अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो.ते खरेच आहे.माणसाच जगन हे पूर्णता त्याला मिळणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून असते .आपल्याला ही ऊर्जा अन्नातून मिळते .दोन वेळच पोटभर जेवन माणसाला सुदृढच बनवीत नाही तर त्याला शांती देते,समाधान देते, जीवनाला बळ देते.म्हणून माणसाच्या आत्माला शांत करायचा दरवाजा थेट जिभेजवळ जातो .पूर्वीच्या काळात माणूस दोन वेळच्या अन्नाची भूक चटणी भाकरीवर भगवायचा.सन,उत्साह,विवाह आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुंचार म्हणून घरात गोडधोड सिजायच.त्यात पारंपारिक पक्वाने केली जात.दिवाळी,दसरा,होळी,पोळा या सानाला घरातील स्त्रियांच्या पक्वानाला आठ दिवसापासून सुरुवात व्हायची.घरात पदार्थ्यांचा सुगंध दळवळायचा.पाहुण्यांची वरदळ राहायची.दिवाळीच्या फराळ करायच्या निमित्याने गावतील पाहुण्यांना मानाने बोलावल्या जायच त्यानिमित्याने बालपणाच्या मैत्रिणींचा माहेरी आल की मिलाफ व्हायचा.एकमेकांची सुखदुःख त्यानिमित्याने वाटली जायची.म्हणून दिवाळीला माहेरी जायची आतुरता,मामाच्या गावाला जायची मुलांची तगमग राहायची . ही सगळी परंपरागत मुल्य आपण बघितली आहे.अनुभवलेली आहे. सानाचा...
साहित्यक्षेत्रातील झुंडीकरण
- Get link
- X
- Other Apps
साहित्यक्षेत्रातील झुंडीकरण .... महाराष्ट्राची माती ही थोर साहित्यिकांच्या पदस्पर्शने पुलकित झालेली आहे . संत ,पंत आणि तंत साहित्याची खान याचं मातीत रुजली आणि बहरली सुद्धा ... संतांची थोर अभंगे ,पंतांची आख्यानकाव्ये आणि तंत काव्याची ,ढोलकीच्या तालावर थिरकणारी,मदमस्त करणारी धडाकेबाज लावणी ,पराक्रमाचे गौरवगीत गाजवणारे पोवाडे , महाराष्ट्राच्या मनामनावर आजही राज्य करीत आहे .याचं मराठी साहित्याच्या संस्कारावर मराठी माणूस घडला आणि लढलाही... मराठी सारस्वत थोर आहे .त्याचा पायाच मुळी ज्ञानयोगी ज्ञानेश्वरांनी घातला आहे .आणि म्हणून मराठी भाषेचं सामर्थ्य आणि गोडवा कायम टिकवून ठेवणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयांच आद्य कर्तव्य आहे .त्याकरिता वाचन संकृती ही विकसित होणे महत्वाचे आहे . आज वाचनसंस्कृती विकसित होतं नसली तरी साहित्यिकांच्या झुंडशाहीत कमालीची वाढ होतांना दिसते आहे .म्हणून वाचन संस्कृती विकसित झाली असे आपल्याल...
स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर
- Get link
- X
- Other Apps
स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाजात प्रस्थापित समाजव्यवस्थेचे सर्वत्र अंधुक धुके पसरले असतांना ,सामाजिक असमानतेचे धुके दूर करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला .ते म्हणजे थोर भारतीय विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतीय समाज क्रांतीचे मुकुटमणी, दलितोद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर....त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क ,अधिकारच नाही तर त्यांच्यात स्वाभिमान जागविण्याचा महत्वपूर्ण विडा उचलला .समाजातील उपेक्षित घटकांना त्यांना न्यायचं मिळवून दिले नाही तर त्यांच्यात आत्मविश्वासाची महत्वपूर्ण फुंकर त्यांनी घातली . स्त्री मुक्तीचे ते पक्के समर्थक होते.समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्री पुरुष समानतेवर अवलंबून आहे .त्यामुळे त्यांनाही प्रत्येक अधिकार मिळायला हवा ,यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले .समाजातील शोषित स्त्रियांना काळोखाच्या अंधारातून प्रकाशाच्या उजेडात आणणारे ते क्रांतिसूर्य होते .ज्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्मम स्थान होते. स्त्रियांना ...
स्त्री मना तुझी कहाणी!
- Get link
- X
- Other Apps
स्त्री मना तुझी कहाणी! मी एक स्त्री म्हणून जेव्हा जेव्हा स्त्री मनाला उलगडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तेव्हा मला याची जाणीव होते. की, स्त्री मनाची खोली छेदन हे सहज शक्य नाही.जसे अथांग सागरातील पाण्याचा अंदाज घेता येत नाही. सागरामध्ये किती मौल्यवान वस्तू, माणिक मोती,वनस्पती दडलेल्या आहे याचा वेध घेणं शक्य होत नाही.तसे स्त्री मनाच्या खोलीचा अंदाज घेणं अशक्यच म्हणावं लागेल!म्हणून मला सागर आणि स्त्रीमनाशी तुलना करतांना बरीचशी साम्यता वाटते. खरं तर स्त्री मन हे नाजूक असते, संवेदनशील असते, कमजोर असते, हळव असते असा अनेकांचा अंदाज असतो.पण ते खरे नव्हे.जरी ती शरीराने नाजूक असली तरी मनाने मात्र कणखर असते,मजबूत असते, न खचणारी , अनेक संकटाना, अडचणीला तोंड देण्याची आत्मशक्ती तिच्यात असते. तिची अंतर्मुखता इतकी प्रगल्भ असते की तिला स्वतःच्या भावना आवरता येते.नियंत्रित करता येते. आपले दुःख,आपल्या भावना, इच्छा बाजूला सारून इतरांच्या भावनेला प्राधान्य देण्यात तिला समाधान,आनंद वाट...