Posts

Showing posts from January, 2020

डॉ .बाबासाहेब आंबेडकर

        डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा माझ्या जीवनात झालेला प्रभाव. ..       आपल्या जीवनात आपल्याला प्रेरणादायी ठरावी अशी आपली  भारतीय संस्कृती थोर आहे . प्राचीन काळापासून अनेक पराक्रमी ,शूर वीर ,धाडसी राजे महाराजे याच भूमीत होऊन गेलेत .त्यांचा इतिहास निश्चितच  आपल्याला प्रेरणा देणारा असतो त्यामुळे पूर्वीपासून आपला  ऐतिहासिक प्रवास मला अभ्यासाला आवडते .खरं आपल्या थोर संस्कृतीचा  प्राचीन ,अर्वाचीन आणि आधुनिक विचारांचा साज आहे .तो जगातील कुठल्याही संकृतीला नसावाच .      आपल्या जीवनात अनेक लेखकांचे विचार आपल्या मनावर ,आपल्या व्यक्तिमत्वावर  छाप ठेऊन जातात .त्यापैकी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे अथांग सागरच ....या अथांग सागरात विचारांची इतकी मौल्यवान रत्ने आहेत की कुठलाही मानव सुवर्णमय विचारांनी आपली तृष्णा भागवू शकतो .त्यांचा विचारांचा प्रभाव माझ्याही विचारांना सुवर्णमय करून गेला .       त्यांना अभ्यासतांना आपल्या विचारांचे  अनेक पै...