वर्तमान पत्राची भूमिका -काल आणि आज *********************************** वृत्तपत्रे हा मानवी जीवनाचा एक आवश्यक घटक आहे.म्हणुनच वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हटले जाते.रोजच्या ताज्या घडामोडी घेऊन येणारे वृत्तपत्राचे स्थान आजही माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक वेगवान प्रसार माध्यमे असतांनाही टिकून आहे. यावरूनच आपल्याला वृत्तपत्राचे महत्व व भूमिका कळून येते.विश्वसनिय माहिती,ज्ञान,प्रबोधन आणि मनोरंजन करणारे विविधांगी मजकूर वृत्तपत्रातून प्रकाशित केले जाते.म्हणूनच वृत्तपत्राला समाज मनाचा आरसा सबोधला जातो. चौदाव्या शतकात चीन मध्ये कागदाचा शोध लागल्यानंतर जर्मनी मधील जोहान्स गुटेनबर्ग याने इ.स.1436 ला मुद्र्णाचा शोध लावला.त्याने अक्षराचे खिळे तयार करून आपल्याच मुद्राणालयात 'बायबल' ची छपाई केली.त्याबरोबरच लेखनाचे अनेक दालने खुली झाली व ज्ञानाचे क्षेत्रे व्यापक बनले.त्याच बरोबर जगातील पहिले वृतपत्र इ.स.1780 ला 'लंडन गँझेट' इंग्लड मध्ये प्रसिद्ध झाले.भारतामध्ये पहिले वृतपत्र ...