जागतिक पुस्तकं दिन :पुस्तकं माझा मित्र
जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. चौदाव्या शतकात चीनमध्ये कागदाचा शोध लागल्यानंतर जर्मनी मधील जोहान्स गुटेनबर्ग याने इ.स.1436 ला मुद्र्णाचा शोध लावला.त्याने अक्षराचे खिळे तयार करून आपल्याच मुद्राणालयात 'बायबल' ची छपाई केली.त्याबरोबरच लेखनाचे अनेक दालने खुली झालीत. लिखित, प्रायोगिक तंत्रज्ञानाचे ज्ञान क्षेत्रे व्यापक बनले. ज्ञानाच्या या अथांग सागरात अनेक शब्दरूपी मौल्यवान विचार तरंगायला लागले. या शब्दरूपी सागराची रुंदी इतकी विस्तारली की ज्ञानाच्या, विचारांच्या अनेक शाखा विस्तारल्या आणि त्यात अनेक ज्ञानयोगी, विचारवंत, अभ्यासक, तत्वचिंतक, लेखक, साहित्यिक,समीक्षक इतिहासकार आपली ज्ञानतृष्णा भागवू लागले. रानटी अवस्थेत असलेल्या या मानवाने चंद्रावर पाय ठेवण्यापर्यंत जी मजल गाठली व जोकाही आमूलाग्र बदल घडवून आणला तो काही चमत्कार नव्हे, तर...