तू बन रणरागिणी
तू बन रणरागिणी! खांद्यावर घेऊन, आकाश अर्धे चला जाऊया पुढे, नव शतकाच्या पाठीवर लिहू समानतेचे धडे महिलांनी महिलांच्या हक्क अधिकारासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.जागतिक पातळीवर महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या जगभऱ्यातील रणरागिणीला आजच्या दिवशी मानाचा मुजरा ! महिलांना मतदानाचे हकक,संपत्ती हक्क ,समानतेचे हक्क ,शिक्षणाचे हक्क मिळून देण्यासाठी जागतिक पातळीवर स्त्रियांनी लढा दिला .आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची सजगता दाखवून स्त्रियांच्या आत्मभानाला जागृत केले. त्या सर्व स्त्रियांच्या नेतृत्वाला नतमस्तक होण्याचा हा दिवस ! त्यांच्याच या लढ्यामुळे आज स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांदयाला खांदा लावून पुढे जात आहे. अवघड क्षेत्र तिनी आपल्या जिद्दीने आणि परिश्रमाने पादाक्रांत केले आहे . घराचा उंबरठा न ओलांडू शकणारी स्त्री आज अनेक अवघड क्षेत्रातही आपल्या कार्य कर्तृत्वामुळे भरारी घेत आहे . असे सकारात्मक चित्र असतांना दुसरीकडे मात्र अनेक कौटुंब...