स्त्री सक्षमीकरण
जागतिक महिलादिन :स्त्री शक्तीचा जागर खांद्यावर घेऊन, आकाश अर्धे चला जाऊया पुढे, नव शतकाच्या पाठीवर लिहू समानतेचे धडे असे म्हणत 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहाने जगभऱ्यात साजरा करण्यात येतो .महिलांनी महिलांच्या हक्कासाठी ,अधिकारासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस विशेष महत्वाचा आहे .जागतिक पातळीवर महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या जगभऱ्यातील रणरागिणीला आजच्या दिवशी माना2!चा मुजरा...ज्या समाजव्यवस्थेत स्त्रियांना उपभोगाचे व कष्ट करण्याचे साधन समजल्या जायचे त्या समाजातील महिलांना मतदानाचा हक्क ,संपत्ती हक्क ,समानतेचे हक्क ,शिक्षणाचे हक्क मिळून देण्यासाठी जागतिक पातळीवर लढा दिला ,आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची सजगता दाखवून स्त्रियांच्या आत्मभानाला जागृत केले ,त्या स्त्रियांच्या नेतृत्वाला नतमस्तक होण्याचा हा दिवस !त्यांच्याच या लढ्यामुळे आज स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांदयाला खांदा लावून पुढे जात आहे. नवनवीन क्षेत्रात तिने आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे .अवघड क्षेत्रातही तिनी आपल्या जिद्दीने आणि पर...