आसवांची आभाळमाया 📋🖋️
आसवांची आभाळमया! आसू भरी है, ये जीवन की राहे, कोई उनसे कहदे हमे..... रोते रोते हसणा सीखो, हसते हसते रोना.. रोना चाहे रोना पाये दिलं कितना... दिलं हुम हुम करे घबराये, एक बुंद पाणी की....अशा एक नव्हे अनेक गाण्यामध्ये मानवी मनाची आणि डोळ्यातील आसवांची सांगड व्यक्त केली आहे. डोळ्यातील अश्रू हे भावभावना व्यक्त करणारे जनू साक्षीदारच! मानवी भावभावनांचे जाळे इतके विस्तीर्ण अफाट आणि गुंतागुंतीचे आहे कि ते सोडवता येत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर... मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना... किंवा..असं कसं घडलं कसं जागे पनी तुले असं सपन पडलं.... असचं काहीस हाती न येणार.अंदाज न लागणार मन फार व्यापक आहे.मनाच्या कोपऱ्यात कायम दडून बसतात ते अश्रू ! झरा जसा अलगदपने बेटाबेटातून , रानावनातून, डोंगरदर्यातून , कडेकपारितून आपल्याच मस्तीत बेधुंद वाहतो.तसा भावभावनांचा खेळ.... भावनाही अशाच स्वच्छंदपणे वाहणाऱ्या....भावनांचा तळ न गाठता येणाराच ! भावनांच्या आश्रयाला कायम चिपकून असता...