माणूस द्या मज माणूस द्या!
*माणूस द्या मज माणूस माणूस द्या... माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला लोक दर्शना जाती देव दिसावा म्हणूनिया तर देव बोले मज माणूस न दिसे अजब तमाशा हा कसला माणूस द्या मज.... राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच हे भजन आजच्या युगाला अगदी तंतोतंत लागू पडतो. अस नाही का वाटत? आज माणूस नावाचा प्राणी दिसेनासा झाला हो...! कुठे हरवलाय हा माणूस? कुठे शोधता येईल का त्याला?.. देवालाही तो दिसेनासा झाला असं असल्यावर आपण तर सामान्य माणूस मग भेटल का कुणाला हा माणूस ? हृदयाचा जो सरळ असे सर्वांवरी जो प्रेम करी कुटील नको असला तसला माणूस द्या मज... माणूस शोधतांना राष्ट्रसंत म्हणतात. तो सर्व जीवसृष्टीवर प्रेम करणारा असावा, तो सरळ मनाचा, ह्रुदयात कुठल्याही वाईट भावना ठेवणारा नसावा, त्याच मन हे कुटील भावनेने पछाडलेलं नसावें, त्याने कुणाचं वाईट चिंतू नये.. कुणालाही फसवू नये, तो सोज्वळ, सहृदयी, संवेदनशील , प्रांजळ मनाचा असावा.. तो कपटी, स्वार्थी, क्रोधी, लोभी, अहंकारी वृत्तीचा नसावा... त्याच्या हृदयात प्रेम, माया, ममता, आपुलकी अ...