अनाथांची माय
अनाथांची माय शोधतांना ! पद्मश्री सिंधूताई सपकाळ अनाथांसाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेणाऱ्या माई आज आपल्यात नाहीत.एकचवेळी अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आणि अनेक अनाथांना आपल्या हृदयाशी जोडणाऱ्या हृदयसम्राज्ञी आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही.न भुतो न भविष्यति.. असेच त्यांचे कार्य आणि कर्तुत्व ! जेव्हा असे महान कर्तृत्ववान व्यक्तीमत्व या समाजात जन्माला येतात तेव्हा अमौलिक कार्य सिद्धीस येते. भरकटलेल्या, दिशाहीन समाजाला योग्य दिशादर्शक त्या ठरतात. मरावे परी किर्तिरुपी उरावे.. असे त्यांचे लौकिक असते. अखंडपणे तेवत राहणाऱ्याना दीपस्तंभाप्रमाणे समाजाला निरंतर कार्यतत्पर आणि प्रकाशमान करत असतात. अशा व्यक्ती लोकांच्या मनात कायम जीवंत असतात. सिंधूताई आपल्यात राहणार आहे युगानुयुगे! सिंधुताईने आपल्याला भरभरून दिलं. वाईट प्रसंगाशी लढण्याची वृत्ती , माणुसकी, परोपकारी भावना, दया, क्षमा , संस्कार,संवेदनशीलता, जिव्हाळा, प्रेम, मानवता काय काय नाही शिकवून गेल्या त्या आम्हाला..!! आज कुठल्या ग्रंथात, कुठल्या ...