थोडं तरी दुसऱ्यांसाठी जगता आलं पाहिजे...
थोडं तरी इतरांसाठी जगता आलं पाहिजे..... मनीषाने दहावी पास होऊन अकरावीला आमच्या महाविद्यालयामध्ये चार वर्षाआधी प्रवेश घेतला होता. वडील मूळचे छत्तीसगडचे मोल मजुरी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात आलेले.मनीषाच्या पुन्हा दोन बहिणी त्यातील मोठीच लग्न वयाच्या अठराव्या वर्षीच झालं होत. घरच्या बिकट परिस्थितीमुळे मनीषा व तिच्यापेक्षा दोन वर्षाने मोठ्या असलेल्या बहिणीच शिक्षण आजीकडे झाले होते .तिची बहीण दहावी होताच आईकडे छत्तीसगडला निघून गेली. तर सहावीनंतर मनीषाला दहावीपर्यंत वडिलांनी पुन्हा आश्रमशाळेत टाकले. मनीषाला घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे ती मन लावून शिकत होती.दहावीत तिला 60%गूण मिळाले होते.यानंतर तिला वडिलांनी छत्तीसगडला नेले. त्यामुळे मनीषाच शिक्षण बंद झालं व ती मोल मजुरी करू लागली. शिकण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या मनीषाचं मन मात्र शाळेत गुंतलं होत.तिच्यातली शिकण्याची जिज्ञासा तिला स्वस्थ बसू देतं नव्हती. एक वर्षानंतर पुन्हा वडील मोलमजुरी करण्याकरीता ...