Posts

Showing posts from November, 2018

न उलगडणाऱ्या चेहऱ्याचे कोडे ...!!

न उलगडणार्‍या चेहऱ्याचे कोडे.....!!        सृष्टीची निर्मिती कशी झाली व कधी झाली यावर अजूनही नेमकं संशोधन होऊ शकलं नाही .पण एक मात्र निश्चित की सर्वांग सुंदर सृष्टी निमार्ण झाली ती अनेक रंगबीरंगी चेहरे घेऊनचं  ...यात  खळखळणाऱ्या नद्या ,उंच पर्वतातून बेधुंद वाहणारे झरे,अमर्याद रत्ने ,वनस्पती आपल्या सखोल अतित्वात सामावून घेणारे समुद्र , दऱ्या खोऱ्यातून घडणाऱ्या सशक्त मनगटाची व इतिहासाची साक्ष देणाऱ्या सह्यांद्रीच्या पर्वत रांगा ...काश्मीर ते कान्यकुमारीपर्यंत पृथ्वीवर स्वर्गाची अनुभूती निर्माण करणारं नैसर्गिक सौदर्य ...हे सर्व काही मनाला भुरळ घालणारं ... सृष्टीचे  अगणित रूप  पानाफुलांपासून ते मानवी चेहर्यापर्यंत एक न उलगडणारे कोडंच जणू ...शेकडो वनस्पती ,विविध रंगांची पाखरे ,मनाला आकर्षित करणारे सुंदर रंगबिरंगी पक्षी , फुले ,पाने सर्वच अवर्णनीय ,अकल्पनीय ,अद्भुत ......यातील कुठल्याच घटकात साम्यता नाही . रंग रूप ,गधंही प्रत्येकांची वेगवेगळी !          जसे नैसर्गिक घटकांचे रूप वेगवेगळे तसे  मानवी...