झेप वादळातली !
झेप वादळातली ! स्त्रियांच्या शोषक वृत्तीच्या कथा आपण बऱ्याच वाचल्या असणारं !मग त्या रामायणातील सीतेच्या वाटेला आलेल्या भोगवाटा असो किंवा महाभारतातील द्रौपदीच्या वाट्याला आलेलं अग्निदिव्य!अनादी अनंत काळापासून स्त्रियांनी शोषलेले दुःखकष्टाचे चटके आणि तिच्या असाह्यतेची वाटचाल निरंतर सुरूच आहे.कधी ती अबोलतेने सारं काही सहन करते तर कधी आत्मबळाच्या साह्यतेने तटस्थपणे येणाऱ्या वादळाशी झुंज देते! एकप्रकारे स्त्रीला आपलं स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्यातून तावून सुलाकून जीवनाच्या वाटा शोधाव्या लागतात.अशाच एका धैर्यशील , स्वयंस्फूर्त तेजाने आत्मनिर्भर झालेल्या स्त्रीचे व्यक्तिमत्व उलगडण्याचा प्रयत्न मी केला आहे. शीतल नुकतीच अकरावीतून बारावीला गेली होती. सरळ नाक, सुदंर चेहरा , लांब सडक केस, सडपातळ अंगकाठी आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य..अनेकांना आकर्षित करणारं ! तारुण्याच्या वाटेवर नुकतेच टाकलेले तिचे पाऊलं अनेकांना भुरळ पाडणारं असंच होतं . त्यावेळी आम्ही कॉ...