हीच खरी कसोटीची वेळ!
कसोटीची खरी वेळ! जागतिक स्तरावर देश झपाट्याने विकासाच्या दिशेने झेपावत असतांना कोरोनाच्या प्रकोपाने समाजजीवन विस्कळीत झाले. पहिल्या लाटेच सावट दूर होत असतांना दुसरी लाट अनेकांच्या मानगुटीवर स्वार झाली.माहामारीने रौद्र रूप धारण केले. हे रूप इतके विनाशकारी असू शकते हे कुणाच्या ज्ञानीही नसावे... यात अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले. सगळीकडे दुःखाचे सावट पसरले. जीवाला जीव लावणारी ,कुटुंबाचा आधार असलेली व्यक्ती काळाआड झाली. काळीज ओलावणारे दुःख सहनशीलतेच्या पार गेले. भावनेचा तोल सावरणे अनेकांना कठीण झाला . अनेकांचे पूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. अशा परिस्थितीत न पेलावणाऱ्या दुःखाचे चटके असह्य झाले की स्वतःला सावरणे फार कठीण असते. माणूस दुःखाने दुर्बल, निराश, एकाकी होतो. घरातील कर्ता माणसाच्या अकाली निधनामुळे कुटुंबाची होणारी आर्थिक, भावनिक होळपळ होते. मित्र, नातेवाईक जीवाला जीव लावणारी मानस गमविल्याचे शल्य मनाला असह्य करते.अनपेक्षितपणे दुःखाचे डोंगर तुटून पडावे आणि क्षणात सर्व उध्वस्त व्हावं अशी भयावह स्थिती स...