Posts

Showing posts from March, 2021

दुरावलेल्या सावल्या!

दुरावलेल्या सावल्या !       पृथ्वीवरील जीवसृष्टीत मानव म्हणून जन्माला येणे म्हणजे आपलं भाग्यचं म्हणावं लागेल.मानवरूपी अस्तित्व म्हणजे जीवनातला खरा हर्षोल्हास... अभिव्यक्त होणे, मुक्तपणे हसणे , एकमेकांशी संवाद साधने , नातेसबंध मित्रभाव जोपासने,एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणे ,अडचणीत एकमेकांना साथ देणे हेच मानवी जीवनाचे मूल्ये....एकंदरीत मानव म्हणून जन्माला आलो तर या सर्व संवेदना आपल्यात असल्याचं पाहिजे...जीवन जगत असतांना जीवनाचा प्रारंभ आणि शेवट हेच मानवी जीवनाचे अंतिम सत्य....बाल्यावस्थेपासून  तर  वृद्धाश्रमापर्यंतचा प्रवास प्रत्येकांना काटायचा असतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी, प्रेमभाव, नात्यातील ओलावा हा राहायला हवाचं..मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य...अमरत्वाची संजीवनी अद्यापही कुणाला गवसलेली नाही.म्हणून जीवन जगतांना नातेबंधातील ओलावा हा असावाच.. पण हा ओलावा कुठेतरी आटत चाललेला दिसतो आहे. बालपण, तारुण्य, वृद्धत्व यातून सर्वांनाच प्रवास करायचा आहे .मग वृद्धवाच्या वळणावर येताच माणूस माणसाला का दुरावतो ? ज्या अवस्थेत माणसाला आपुलकीची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, साहानुभुत...

द रिअल फायटर यंग मॅन

द रिअल फायटर यंग मॅन ! (मृत्यूला हरविणारा माणूस )                ही कहाणी आहे, बारा वर्षापासून मृत्यूला झुंज देणाऱ्या एका जाहाबाज तरुणाची...मृत्यूला हरविणाऱ्या ' द रिअल फायटर यंग मॅन ' ची दखल आपण सर्वांनी घ्यावी हाच  या कथेमागचा उद्देश  !!         तेरा वर्षांपूर्वी गोविंदला एका खाजगी सहकारी संस्थेत नोकरी लागली होती. अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाने त्याने  अधिकाऱ्यांचे मन जिंकून  घेतले होते. सुरेख हस्ताक्षर, कॉप्युटरच विशेष ज्ञान, हसमुख, सर्वांना आपलं करणारा स्वभाव आणि मेहनत करण्याची जिद्द बघून त्याला लवकरच नोकरीमध्ये बढती मिळाली. नागपूरहून उमरेड शाखेला त्याची नियुक्ती करण्यात आली . याचंबरोबर त्याचा रोजचा नागपूर ते उमरेड प्रवास सुरु झाला. काहीवर्षे सुरळीत  गेले पण  नियतीला मात्र काही वेगळंच साध्य करायचं होत .एखादा चातक पक्षी उंच उंच भरारी घेऊन आपल्या विश्वात रमावा आणि अलबत त्याचं वेळी त्याच्या पंखावर अनपेक्षितपणे  वार होऊन  तो क्षणार्धात खाली कोसळावा असंच काहीस गोविंदशी झालं.    ...