अग्निदिव्य !
अग्निदिव्य ! शकीला एका मुस्लिम परिवारात जन्माला आलेली एक चुणचुणीत मुलगी. लहानपणापासूनच आमची ओळख. तिची आई आमच्याकडे घरकामाला यायची. आईच बोट धरून येणारी शकीला आणि माझी लवकरच मैत्री जमली.आईसोबत ती घरी आली की आम्ही मनसोक्त भाहुल्या, खेळभांडे खेळायचो. जवळपास दहावीपर्यंत ती माझ्या संपर्कात होती. शकीलाच्या परिवारात आणखी तिच्यापेक्षा मोठ्या चार बहिणी होत्या . वडिलांच छत्र लहानपणीच हरवलेले होत . त्यामुळे पाचही मुलींची जवाबदारी तिच्या आईवर होती. असं असतांना चार घराच्या मिळकतीवर चार बहिणीचे लग्न तीने लवकरच उरकवले . तीच घर माझ्या घराजवळच इंदिरानगरातील झोपडपट्टी मध्ये होत. सरकार कडून मिळालेल्या थोड्या जागेत शकीलाचा पूर्ण परिवार राहायचा. चार घरची धुणीभांडी करून तिच्या आईने अगदी लहान वयातच सर्वांचे लग्न उरकून टाकले होते. त्यामुळे शकिलाचही लग्न उरकवून आपण मोकळं व्हाव असं तिला वाटायचं . आणि तसा योगही लवकरच आला. एका जवळच्या नातेवाईकासोबत अब्दुल शकीलाच्या घरी काही कामानिमित्य आला असतांना. ...