उध्वस्त करणार वादळ!!


                  उध्वस्त करणार वादळ!


            कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्व जनजीव न विस्कळीत झालेलं असताना आता हळू आपण सावरायला लागलो.पण या सर्वात  मात्र माणसाचं जगणं आणि वागणं बदलून गेलं आहे.कित्येकानी आपले आप्तस्वकीय हरविले.यात कुणाची आई, वडील, भाऊ, बहीण तर कुणाचा एकुलता एक मुलगा... आईवडिलांचं छत्र हरविलेली कित्येक पोरकी मुले... तर नुकतच लग्न झालेल्या मुलींचे हरविलेलं कुंकू.....निष्ठुर नियतीने यात ज्यांना दुःख द्यायचं होत त्यांना कुठेच कसर सोडली नाही. जगण्याचा श्वास हिरवून घेणार असहय दुःख देऊन जाणारा हा काळ म्हणजे एक महाभयान प्रकोपच .... येणाऱ्या दहा पिढ्याना आठवणीत राहील असाच हा  काळ आपण अनुभवलेला आहे.

            आलेला काळ निघून गेला पण  माणसाचं जीवन कस क्षणभगूर असते.याच गूढ उकलून गेला.हातातली वाळू निसटून जावी तस माणसाचं जगणं निसटून गेलं... जाणारे डोळ्यात अनेक स्वप्न साठवून गेले...त्यांचे चेहरे अजूनही डोळ्यापुढे येतात...कोरोनाच येणार वादळ आपलं जीवन उध्वस्त करून  जाईल याची पुसटही कल्पना नसावी .... कुणीतरी आपलं काळीज काढून न्याव आणि जिवाच्या आतंकाने मन सैरावैरा पळत जावं तसच काहीच दुःख उपभोगलं सर्वांनी...कदाचित रहस्यमय जीवनाचा अर्थच माणसाला उलगडून द्यावा याचीच ही प्रचिती असावी....असं कुणीच नसावं ज्यांनी आपल्या जवळच कुणी गमावलं नसावं. एक जवळचा मित्र गमवल्याच  दुःखही  आमच्या वाट्याला आलं..... नुकताच आपल्या कर्तृत्वाने त्याने गगन भरारी घेतली होती. बी ए ला असतांना आम्ही सोबत शिकलो.मी आणि माझी एक मैत्रीण असेच वीस वर्षानंतर एकत्र आलो पुन्हा मैत्रीला कौटुंबिक मैत्रीची जोड बसली.कुठेही बाहेर फिरायला जातांना आम्ही तिन्ही कुटुंब सोबत असायचो. मला तो मॅडम म्हणायचा...सुखदुःखात आम्ही सखे सोबती एकत्र असायचो. कित्येक स्वप्न तो बोलून दाखवायचा.... मुलाला डॉक्टर बनवायचं स्वप्न, चांगलं घर बांधण्याचं स्वप्न, उदयोगात उत्तुंग झेप घेण्याचं स्वप्न सार सार काही.... आमच्या तिघांही परिवाराचे सुखदुःख एकमेकांपासून लपले नव्हते.... एका सधन कुटूंबातील असतांनाही राजेंद्रला समाजात एक वेगळी ओळख स्वतःची बनवायची होती. त्याकरिता तो अविरत धडपडत असायचा. यातच त्याच्या स्वप्नाला पंख फुटू लागले. यशाची आणि स्वप्ननाची एक एक पायरी तो चढू लागला... त्याचा उद्योग चांगला वाढू लागला. वैभवाचे, सुखसंपन्नतचे  आणि स्वप्न परिपूर्तेचे दिवस त्याच्या चेहऱ्याचे हर्षउल्हासाची साक्ष देत होते. नुकतेच आपल्या स्वप्ननातील घर बांधून घरात राहायला गेला होता. आता आपण सगळे सधन आहोत आता यापुढे आपण परदेशवारी करू हे त्याचे बोलणे काळीज चिरून जातात.... आम्हाला एक भाऊ, एक मित्र म्हणून तो खूप जीव लावायच्या. घराच्या कुठल्याही वस्तू घ्यायच्या असल्यास दोघीनाही विचारल्याशिवाय त्याच पान हलायचं नाही. असा आमचा सोज्वळ, निर्भेळ, निशीम प्रेम करणारा मित्र काळाच्या आड कधी गडप झाला कळलं नाही. त्याच जान जीवाचं रान करून गेलं.
अशीच ती कोरोनाची लाट त्याला शिवून गेली.घरात जनसेवेचा वारसा सांभाळत समाजासाठी झिजणारा, कुठल्याही वाईट प्रसंगात दुसऱ्यांसाठी धावून जाणारा आमच्या निःस्वार्थ मित्र जनसेवेचा ध्यास घेत कोरोना ग्रस्ताची मदत करताना कोरोना पॉसिटीव्ह झाला. आणि हेच वादळ त्याचं जीवन उध्वस्त करून गेलं. समाजातील कित्येक मन त्याच्यासाठी रडलं.... त्या दिवशी त्याचं जन्मगांव त्याच्या जाण्याने  अबोल झालं. प्रत्येकाची मने त्याने जिंकली होती. आपल्या कर्तृत्वाने जनजीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारा राजेंद्र प्रत्येकाच्या काळजावर आपलं नाव कोरून गेला होता . त्याचं राजकीय, सामाजिक कार्य अतुलनीय होतं. समाजातील उमद्या तरुण मुलांना हाताशी घेत तो गावासाठी झटत होता. कुणाचीही मोकळ्या हाताने मदत करत होता. कमी वयात त्याची राजकीय कारकीर्द  धडाडीची होती.त्याच्यात एका मोठया नेत्याची प्रतिमा दिसायची. येणाऱ्या भविष्यात त्याचं राजकीय जीवन उज्वल होतं. समाजातील अशी कर्तृत्वान व्यक्ती हरवली तर कुटूंबाच नुकसान होत नाही तर  समाजाचीही खूप मोठी हानी होते.राजेंद्र कायमचा सर्वांना सोडून गेला.... त्याचं दुःख त्याच्या कुटूंबाला न सोसणार आहे. अजूनही तो कायमचा  या जगातून निघून गेला यावर विश्वास बसत नाही. अनेकांच्या मनावर सत्ता गाजवणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीच असच असते ते नेहमीच चिरकार स्मरणात राहतात!!

            अशा अनेक कुटुंबाचे आधार असलेले खांब काळाच्या ओघात कोलंडून पडले. असे कित्येक कुटूंब या वादळात उध्वस्त झाले. मनाला न पेलवणार दुःख, सगळीकडे आक्रोश, रोजच्या मृत्युंचे आकडे प्रत्येकाच्या हृदयात दहशत निर्माण करणारे होते . रोज आपल्याशी संबंधित परिचयाच्या मृत्यूची बातमी कानावर आली की जीव कासावीस व्हायचा. इतका भयाण काळ जन्मापासून कधीही अनुभवला नाही.म्हणतात ना आले देवाजीच्या मना तेथे कुणाची चालेना... कोरोना नावाचं वादळ असचं....
         .आता अनेक कुटुंब आपले जीवन हळू हळू सावरत आहे. पण कधीही भरून न निघणारी हरविल्या माणसाची पोकळी कायमच मनाला अस्वस्थ करीत राहील...अनेक लहान मुलांचे पोरके झालेले छत्र भरून निघणार नाही. आपल्या जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याचं दुःख  कुणी विसरू शकणार नाही... तर  एकुलता एक मुलाच्या जाण्याचे दुःख कुठलीही आई विसरू शकणार नाही ....काळीजावर उमटलेले हे जीवघेणे व्रन कधीही मिटणार नाही हे मात्र खरं... म्हणूनच आताही अनेकांचे डोळे आपल्या जिवलग माणसाचा शोध घेत असतात...अजूनही डोळ्यात साठवलेल्या आठवणींनी उर भरून येतो..काळजाच्या जवळ असलेल्या माणसाला डोळ्यात साठवून डोळे मिटून त्याला मनभरून बघणं एवढंच आता हातात उरलं...मनाला  न सोसणाऱ्या वेदनेला कुठलंही औषध नाही.... मनावर दगड ठेवून माणसाला जगाव लागणार आहे. कायम आपल्या हरवलेल्या माणसाच्या शोधात जगाव लागणार आहे...!!

                  जीवनाचं हेच गंभीर्य माणसाला एक शिकवण देऊन जाते. जीवन एका क्षणाच, नाही हे कुणाचं... जीवनातील सर्व सुखदुःखात एकमेकांना आधार देत जगायला हवं. माणसाने आपलं आयुष्य कितीही आपल्या हाताने पकण्याचा प्रयत्न केला तरीही हे आयुष्य क्षणार्धात कसं निसटून जाईल हे सांगता येत नाही.जोपर्यंत आहोत तोपर्यंत मनसोक्त जगून घ्यावं.... जीवनाचे सार कधीही न उलगडणारेच राहील... ते बेधुंद वाऱ्यात कुणाला उध्वस्त करतील सांगता येत नाही.जीवन हे असचं कधी निरंतर झऱ्या सारखं बेधुंद वाहणार..तर कधी डबक्यात साचणार... कधी जीवनाला उत्तुंग शिखरावर घेऊन जाणार तर कधी क्षणार्धात हुलकवण्या देणार... कुणाच्या नशिबात  कधी.. कुठे.. काय घेडेल हे सांगता येत नाही.रहस्यमयी जीवनाचे खोलवर दडलेलं भाकीत कुणालाही सांगता येणार नाही.

            भविष्यात पुन्हा असे संकट येईल याआधी माणसाने माणूस म्हणून दोन क्षण आनंदाने जगाव एवढंच आपल्या हातात आहे. आलेले कितीही मोठे संकट लोटून आपल्याला मार्ग काढीत जगणे हाच मानवधर्म आहे.तो प्रत्येकाने जपावा...मी, माझा यात गुरफडून आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण बिनाकारण घालवत आहोत. जे आहे ते आपलं आहे तेच स्वीकारून आपण येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगावा . कोरोनासारख्या महाभयाण काळाने तर हीच आपल्याला शिकवण दिली. तरीही माणूस नावाचा प्राणी आपल्याच स्वार्थात का गुरफटतो?...इतरांची केलीली अव्हेलना,अपमान,फसवणूक कुठला आनंद देऊन जातो ? इतरांच्या दुःखात तो का आनंदीत होतो?हेच कळत नाही. इथे प्रत्येकाला प्रत्येकाच्या सुखदुःखात साथ देत जगता आलं पाहिजे.माणसाच्या जीवनातला उद्देश इतरांना आनंद देण्याचा असला पाहिजे...
💐
         इतरांच्या सुखात दुखविलेले मनही सावरू शकतात. त्या मनाला उर्मी देण्याचं, त्यांच्यात जगण्याची उम्मीद चेतवायचं कामही आपल्याला करता आलं पाहिजे.... उध्वस्थ झालेले स्वप्न पुन्हा पूर्ण करता येतात .पण त्या स्वप्नाला बळकटी देण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे. वादळ वाऱ्याने उध्वस्त झालेल्या रानात आशेची हिरवीकंच पालवी  घेऊन फुलवता आली पाहिजे.ध्येर्य सामर्थ्याने पुन्हा जीवनाला आशेच्या दृष्टीने बघता येऊ शकते ... पण ती शक्ती नव्या दृष्टीत चेतवता आली पाहिजे... सहानुभूतीच्या, आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या शब्दसामर्थ्याने  माणसाला माणसाशी बांधता आलं पाहिजे . 
        


प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
9021172362
















Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?