स्वप्नांचे पंख
उडान स्वप्नांच्या पूर्ततेची !
देशात मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली . ऑगस्ट २०२० मध्ये स्वातंत्र्यदिनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देतांना मुलींच्या विवाह विषयक पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचे जाहीर केले होते. त्याचं पार्श्वभूमीवर मुलीच्या लग्नाचे वय अठरा वरून एकवीस करण्याच्या ठरावाला संसदेतून नुकतीच मंजुरी देण्यात आली.जी अभिनंदनीय आणि स्वागतार्ह आहे.
वयाचे अठरा वर्षे मुलीने पूर्ण केले की मुलीचे लग्न करण्याची घाई घरापासून समाजापर्यंत केली जाते.मग तिचे स्वप्न, ध्येय, शिक्षण सारं काही अर्धवट... आकाशात मुक्त गवसणी घालण्याआधीच तिचे पंख छाटले जावे तसेच तिला एका चाकोरीबद्ध जीवनाच्या बेडीत अडकाव लागत. अवेळी लग्नाच्या बंधनात स्वतःच्या इच्छा आकांक्षाचा बळी देत समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावाखाली ती बांधली जाते. अठराव्या वर्षामध्ये शारीरिक दृष्टीनेही ती कमजोर असते . शारीरिक व्याधीग्रस्तमुळे गर्भधारनेच्या वेळी अनेक समस्या उद्भवतात.. कमी वयात झालेल्या गर्भधारणेमुळे येणारी पिढीही सदृढ जन्माला येईलच असे नाही. भारतात गरोदर मातेच्या मृत्यूचे प्रमाण अधिक वाढलेले दिसून येतं. त्याचे मुख्य कारण गर्भधारणेच्या वेळी असलेली मानसिक व शारीरिक कमजोरी होय... यामुळेच मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने विवाहयोग्य वय हे २१ वर्षच योग्य ठरेल.
विवाह विषयक नविन कायद्यामुळे समाजात बऱ्याच गोष्टीला आळा बसेल. प्रेमाच्या धुंदीत घरातून पलायन करणाऱ्या व योग्य अयोग्यतेचा विचार न करता क्षणिक निर्णय घेणाऱ्यांवर कायद्याच्या अंतर्गत चोप बसेल.
विवाह होण्याआधी ती निर्णायक दृष्टीने मजबुत होने तेवढेच गरजेचे आहे.तरच ती मुक्तपणे, स्वच्छंदपणे आपल्या ध्येय स्वप्नांची भरारी घेऊ शकेल. अठरा वर्षात लग्न करतांना जे शिक्षण अर्धवट राहायचं ते शिक्षण आता पूर्ण होईल . जीवनात स्वयंपूर्ण , स्वसामर्थ्याने आणि आत्मनिर्भतेने कुठल्याही अडणीचा सामना ती करू शकेल .ती कुटुंबाच्या जवाबदारीचा डोंगर पेलताना सर्वांगदृष्ट्या प्रबळ, कणखर , सदृढ, सशक्त आसायला पाहिजे... वैचारिक, आर्थिक आणि शारीरिक रित्या प्रबळ झाली तरच ती सक्षम बनू शकेल, संसाराची धुरा नीट पेलू शकेल. तेव्हा सरकारच्या या निर्णयाचे आपण कौतुकच करायला हवे..
आपल्या देशात याआधीही विवाहविषयक असे अनेक कायदे व निर्णय घेण्यात आले . मात्र आपल्याला आजही बालविवाह सारख्या वाईट प्रथेला पुर्णपणे नष्ट करता आले नाही.युनिसेफच्या आकडेवारीनुसार, भारतातील२७% टक्के मुलींचे लग्न १८ वर्षांच्या आधी आणि ७%मुलींचे लग्न १५ वर्षांच्या आधी केले जाते. भारतातील काही राज्यांमध्ये आणि समुदायांमध्ये बालविवाह अजुनही सुरु आहे. हे रोखण्यासाठी अनेक कडक कायदे आहेत. पण तरीही अशी प्रकरणे वारंवार समोर येत आहेत . स्त्री आणि पुरुष दोघेही समाजाचे महत्वपूर्ण घटक असल्यामुळे एक सुदृढ, सशक्त आणि विकसित भारत घडवायचा असेल तर परंपरेने चालत आलेल्या या बेगडी प्रथा आपण टाकून द्यायला हाव्यात. अदृश्यपणे पाय रोवून बसलेल्या अनिष्ट प्रथा पुर्णपणे नष्ट व्हायला हव्यात !
एकवीस वर्षाच वय विवाहास योग्य असून याचा सर्वांनी स्वीकार करायचा हवा... एकवीस वर्षाच्या कायदेशीर बंधनामुळे मुलीच्या रक्षणार्थ कवचकुंडले तयार झाल्यामुळे स्वप्नांच्या परीपूर्ततेसाठी ती ध्येयाची उचं भरारी मुक्तपणे घेऊ शकेल. आजपर्यंत समाजाचे जे काही दिलं ते तिने निमुटपणे स्वीकारलं आज समाजनेही तिला समजुन घेतलं पाहिजे. हे नवविचार समाजमनाला निश्चितच योग्य दिशादर्शक ठरेल आणि कायद्याच्या चौकटीत समाज बांधला जावून योग्य दिशेला मार्गस्त होईल...!!
प्रा. वैशाली रितेश देशमुख
ग्रामविकास कनिष्ठ महविद्यालय, कुही
रा. नागपुर
9021172362
.
Comments
Post a Comment