हीच खरी कसोटीची वेळ!

कसोटीची खरी वेळ!
       
        जागतिक स्तरावर देश झपाट्याने विकासाच्या दिशेने झेपावत असतांना कोरोनाच्या प्रकोपाने  समाजजीवन विस्कळीत झाले. पहिल्या लाटेच सावट दूर होत असतांना दुसरी लाट अनेकांच्या मानगुटीवर स्वार झाली.माहामारीने रौद्र रूप धारण केले. हे रूप इतके विनाशकारी असू शकते हे कुणाच्या ज्ञानीही नसावे... यात अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले.  सगळीकडे दुःखाचे सावट पसरले. जीवाला जीव लावणारी ,कुटुंबाचा आधार असलेली व्यक्ती काळाआड झाली.  काळीज ओलावणारे दुःख सहनशीलतेच्या पार गेले.  भावनेचा तोल सावरणे अनेकांना कठीण झाला . अनेकांचे पूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. अशा परिस्थितीत न पेलावणाऱ्या दुःखाचे चटके असह्य झाले की स्वतःला सावरणे फार कठीण असते. माणूस दुःखाने दुर्बल, निराश, एकाकी होतो. घरातील कर्ता माणसाच्या अकाली निधनामुळे कुटुंबाची होणारी आर्थिक, भावनिक होळपळ  होते.
मित्र, नातेवाईक  जीवाला जीव लावणारी मानस गमविल्याचे शल्य मनाला असह्य करते.अनपेक्षितपणे दुःखाचे डोंगर तुटून पडावे आणि क्षणात सर्व उध्वस्त व्हावं अशी भयावह स्थिती सर्वांनी अनुभवली आहे .दगडालाही पाझर फुटावे असे हे मृत्यूचे  तांडव अजूनही काही प्रमाणात सुरूच आहे. नियतीचे रौद्र रूप किती विनाशक, भयावह असह्य करणारे असते हे प्रत्येकांनी अनुभवले. याही परिस्थितीत अनेकांनी जीवाची पर्वा. आपला जीव मुठीत घेऊन सेवाभावी वृत्ती जोपासली . अनेक सेवाभावी संस्थांनी जीवाची पर्वा न करता अन्नदान केले. अनेकांनी कोरोना बाधित मृत शरीराला अग्नी दिला. ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी दिवसरात्र पुरवठा करण्यास सजगता बाळगणारे हात पुढे आले. अनेक डॉक्टर देवदूत ठरले. कोरोना काळात ज्यांनी ज्यांनी मदतीचा हात दिला ते सर्वच गौरवनिय आहे. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम करावासा वाटतो.
     कोरोनामुळे देशाची, समाजाची, कुटुंबाची होणारी हानी भरून निघणे कठीण आहे. अनेकांनी ज्यांना गमावलं त्यांची कमी कधीही भरून निघणार नाही. पण समाजाला यातूनही सावराव लागेल.वाईट काळ, वाईट वेळ निघून जाईल . इतिहास सांगतो आपण मोठं मोठ्या माहामारीतून , परकीय आक्रमणातून  पिढी न पिढी सावरलेलो आहोत. रानटी अवस्थेत जगणाऱ्या माणसाने आजपर्यंत उत्क्रांतीचे शिखर गाठण्यासाठी अनेक वाईट प्रसंगाशी सामना केलेला आहे. तो धिरोदत्तपणे लढलेला आहे. निराशेचे काळवंडलेली ढग आताही नक्कीच मोकळे होतील. पण त्यासाठी सर्वांनी खंबीर समोर चालायला हवे.
       कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राची अतोनात हानी झाली आहे. त्यात शिक्षणक्षेत्रही पूर्णतः विस्कळीत झाले.देशातील 
तरुण पिढीचे भवितव्य शैक्षणिक विकासावर आधारलेलं असतो . शिक्षक,पालक, विद्यार्थी  आणि शाळा यातूनच विद्यार्थी संस्कारीत होत असतो.त्यामुळे शाळा ही विद्यार्थांच्या जडणघडणीचा एक अविभाज्य घटक आहे. पण आज शिक्षक विद्यार्थी, पालक हेच एकमेकापासून दुरावलेले आहे. गेल्या दीड वर्षापासून  विद्यार्थ्यांचे भवितव्य पूर्णतः कोलमडून पडलेले आहे. यातही ऑनलाईन शिक्षणाचा पर्यायी मार्ग निवडला गेला पण तो पुर्णपणे यशस्वी ठरू शकला नाही. असं असतांना दुधात दह्याच विरजण पडाव तशी शिक्षणाची लीपापोती सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता, आपली गुणवत्ता टिकून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्याने सजग राहून अभ्यासात सातत्य कायम ठेवायला पाहिजे. स्वतःच गुरु आणि शिष्य बणायला हवे. ज्याप्रमाणे एकलव्याने दोणाचार्याच्या पुतळ्याला गुरु मानून स्वतःला शिक्षित केलं. अभिमन्यूने मातेच्या गर्भातच चक्रव्यूह भेदण्याची शिक्षा प्रदान केली. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोडून वेद वदविले वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ लिहला. तीच गोष्ट आजच्या घडीला विद्यार्थ्यांनी करायला हवी!
लात मारील तिथे पाणी काढण्याची क्षमता तरुणाईत असते. इच्छा तिथे मार्ग असतोच... वाईटात चागलं शोधण्याची जिज्ञासा आजच्या घडीला विद्यार्थ्यांनी जोपासायला हवी. पुस्तकं वाचायची उत्सुकता शिगेला पोहोचली की यशाचे सर्व मार्ग तयार होतात. अभ्यासाप्रती निष्ठा, चातुर्य, नियोजन, सातत्य कायम ठेवले की यश हमकास पायाशी लोळण घालते. परीक्षा झाली नाही झाली तरी आपल्या बुद्धित्तेचा खजिना रिकामा होऊ नये याची खबरदारी प्रत्येकांनी घ्यायला हवी. यासाठी  विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भतेच स्वप्नं  जोपासून स्वयंसिद्धतेचा, स्वयंपूर्णतेचा, स्वावलंबनाचा ध्यास घ्यायला हवा!  
    कोरोना काळात मानवी जीवनातील गतिशीलतेला खीळ बसली आहे. तो अस्वस्थ, अस्थिर झाला आहे. पण स्थिर जीवन माणसाला किती हतबल,निरस , अर्थहीन बनविते हे आपण अनुभवलं आहे. स्थिरता जीवनाचा अर्थच हिरावून घेते याची यथार्थ जाणीवही मानवी मनाला झाली आहे. त्यामुळे गतिशीलतेशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही.
   मानवी जीवनचक्र हे असंच बेधुंद वाहणाऱ्या नदीसारखं असतं.. ते कधी संथपणे थांबत, वाहतं तर कधी वेडावून खळखळत सुद्धा....माणसाच्या जीवनाचही असेच..त्याचे थांबणे, चालणे, धावणे हे अपेक्षित...मानवी जीवनाची गती क्षीण झाली की ती अधोगतीकडे वळतो ,जीवनाची वाटचाल थांबते.त्याचा विकास खुंटतो.  कोरोनामुळे माणूस स्थिर झाला .चारभिंतीत दडून राहण हेच त्याच्या हितार्थ होत. घरकोंडी शिवाय त्याच्याजवळ पर्याय नव्हताचं... पण ही घरकोंडी फारकाळ हिताची नाही. कोरोणाचा उद्रेक होऊ न देता सावधतेने आता पुढे चालायला हव.  जगण्यासाठी कामाशिवाय पर्याय नाही.पोटाची भूक त्याला जास्त दिवस घरात बंदिस्त ठेऊ शकतं नाही.आणखी काही दिवस कोरोना विषाणू जाईल याची शाश्वती नाही. लॉकडाऊन निरंतर ठेवणे शक्य नाही.मानवी जीवनात गतिशीलतेला फार महत्व असून ती  लोकउन्नतीची पायरी आहे. ती ओलांडणे गरजेचे आहे.ती स्थिर झाली तर कोरोनामुळे उदभवलेल्या  माहामारीपेक्षाही ती घातक ठरेल.जीवनचक्र निरंतर फिरत राहाल तरचं अर्थचक्र टिकू शकतं.अर्थचक्रावर माणसाच्या जीवनाची भिस्त व्यापलेली आहे. म्हणून आता आपल्याला शिस्तीत जगायला हवं.. आपल्या अनियंत्रित जीवनाला नियत्रित करून त्यावर संयमाची, सावधतेची लगाम घालायला हवी.  बेभानतेने सैराचाराने वागणे आता थांबायला हव . गाफील राहून पुन्हा अनेकांना संकटात  टाकने योग्य नाही. ही वेळ पूर्णतः कसोटीची आहे. कोरोना जोपर्यंत संपुष्टात येत नाही. तोपर्यंत प्रत्येकाने आपली, समाजाची काळजी घ्यायला हवी . आता कोरोणाला हकलून लावणे आपल्या सर्वांच्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येक गाव , शहर कारोणा मुक्त कसे होईल यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाहीतर तिसरी लाट कुठल विद्रूप रूप धारण करेल सांगता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकांनी पुढे पडणार पाऊल मोठ्या सावधानतेने, सजगतेने टाकायला हव!
             

प्रा. वैशाली रितेश देशमुख
फोन नंबर ९०२११७२३६२

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?