राज है जिंदगी बस जिते चले जाओ !

राज है जिंदगी
        बस जिते चले जाओ ....!!

          एक अकल्पित रहस्य मानवी जीवनाच्या परिवलनात वास करीत असतो.  जे  आजपर्यँत कुणीही उलगडू शकलं नाही.म्हणूनच अनेकदा ज्या गोष्टीची आपण कल्पनाही करू शकत नाही त्या गोष्टी नकळतपणे जीवनात घडून जात असतात. त्यामुळे  कुणाच्याही जीवनात कधी केव्हा काय घडेल हे सांगता येतं नाही. सुखं समाधाने जीवन जगणाऱ्या माणसाच्या जीवनात दुःखाच  ग्रहण कधी कुठून लागेल याचा अंदाज बांधता येतं नाही.अनिश्चिततेच हे सावट कायम आपला पाठलाग करीत असतो.ते केव्हा, कुठे, कधी आपल्याला  गुरफटेल हे सांगता येतं नाही. मग एकतर आपण आपल्या नशिबाला दोष देतो. किंवा अनेकांच्या शब्दातून आपल्याला सांत्वना मिळतात,   "नशिबात असलेल्या गोष्टी कुणाला टाळता येतं नाही." सारं काही घडत ते अकल्पिच!
        आता बघाना आपला देश जगाच्या पाठीवर किती गतिशीलपणे विकास करीत होता.सर्व काही सुरळीत सुरु असतांना कोरोना सारखा अदृस्य विषाणूने माणसाच्या  जीवनाला व्यापून टाकलं, त्याला बंधक बनवील. मृत्यूचं इतकं आक्राळ  विक्राळ रूप कधीच कुणी अनुभवलं नसेल. जे आज संपूर्ण जग अनुभवत आहे . अक्षरश: मृत्यूचा तांडव थांबणार कधी ? याची शाश्वती अद्यापही कुणाला नाही. आता तर आपल्याला आजूबाजूला तो चक्क कोरोना वावरतांना दिसतो आहे. आपलेच नातेवाईक, मित्र, आई वडील, भाऊ, बहीण यांना कोरोनाची लागण झाल्याची दिसते आहे. दुरून दिसणारा कोरोना आज प्रत्येक जन अनुभवतोय. दहशत इतकी की कोरोना व्यक्तीच्या सावलीलाही शिवन समाज नाकारतो. त्यामुळे कोरोनाच्या सावटापेक्षा समाजाच्या असहकार्यामुळे तो तुटतो.   माणसाला माणसापासून तोडणारा, दूर करणारा हा कोरोना विषाणू आला तरी कुठून ?हे पण एक रहस्यच आहे. माणसाची विचारसरणी  संकुचित करणारा हा रोग संपूर्ण जगाचं कंबरडं मोडतोय हे मात्र खरं !
      कोरोनाची गंभीर परिस्थिती देशावर ओढवली असतांना माणूस मात्र आपल्याच मग्रुरीत जगतो आहे. राजकीय क्षेत्रातील रोजची एकमेकांच्या पक्षावरील चिखलफेक अंत्यत लाजिरवाणी आहे.आज त्यांची  निर्दयता आणि निर्लज्यपणा संपूर्ण देश अनुभवतो आहे. तर काही देवदूत, तारणहार  बनून कोरोनाच्या या संकटात पूर्णपणे स्वतःला झोकून देतं आहेत. आपल्या जीवाला धोक्यात टाकून रुग्णांची सेवा करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि ती सर्वच टीम ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवाला धोक्यात टाकून या अग्निकुंडात उडी टाकली त्या सर्वांच्या कार्याला, कर्तुत्वाला प्रत्येकांनी मनापासून सलाम करायला हवा !
         खरं तर जीवनाचा खरा अर्थ आता प्रत्येकांनी  उलगडायला हवा.. मी, माझं, मलाच्या अहमभावात जीवन जगणाऱ्या माणसाचं आयुष्य हे त्याच्या हातात राहाल नाही. काळ  आणि वेळ कुणाला या जीवनातून अदृस्य करेल हे सांगताच येतं नाही. परिस्थिती मनाला उद्दिग्न करणारी आहे. जग सोडून जातांना  जे खांदे आपल्याला शेवटचा निरोप देतं होते तेही आता भेटणार नाहीत. म्हणून आज प्रत्येकाने आपल्या अंतर्मनात डोकावून जीवन जगायला हवे ! जीवनाचं सत्य, वास्तविकता आपल्या समोर असूनही आपण निद्रिस्तपणे कसं जगू शकतो?जीवनातं आपण कुणाला आनंद देऊ शकलो नाही, तरी चालेलं पण कुणाच मन मात्र  दुखवू नका..!!
      मानवी जीवनाच भयाण रूप आपण अनुभवतो आहे. आपलीच सावली आपल्याला कधी नाकारेल याची शाश्वती नाही.  कोरोना मृतदेहाची विटंबना त्याची हेडसांड  कशी होतेय हे आपण बघतोच. रक्ताचे नाते आपला देह स्विकारायला नाकारतात यापेक्षा जीवनाचं सत्य कुठलं असू शकते ?

“दहशत” सी होने लगी है इस सफ़र से अब तो…

ए-ज़िन्दगी___ कहीं तो पहुँचा दे„„„ख़त्म होने से पहले…

      जीवनाचं अंतिम सत्य आपल्या डोळ्यासमोर आहे.  माणूस जन्माला येतो तो एकटाच आणि जग सोडून जातो तोही  एकटाच..!!मग तो माणूस माणूस म्हणून का जगू शकतं नाही ?तो संवेदनशील आहे.भावनाशील आहे. मग इतरांचे दुःख, संवेदना का वाटून घेऊ शकतं नाही ?तो स्वतःपुरता का मर्यादित राहतो?
जगणं मरणं एका सासाच अंतर असूनही तो असा का वागतो ?
     माणसाने मन भरून जगावं, कुणाला आनंद द्यावा तर कुणाला मदतीचा हात... कुणाचे दुःख वेचावे तर कुणाच्या आयुष्यात हास्याचे क्षण पेरावे.. हेच जीवन..जगणे आणि जगविणे हेच निसर्गाचे सूत्र... जीवनाची व्याप्ती ही सखोल आहे त्याला आपल्यापुरती मर्यादित ठेऊ नका...जीवनातील कुठला क्षण आपल्याला या जगातून जाण्यास भाग पाडेल हे आपल्या हातात नाही. जीवन हे अकल्पित आहे. त्याला आजपर्यँत कुणीही वाचू शकले नाही. कुणाची उणीव, कुणाचं हास्य, कुणाचे दुःख कमी करता येईल तर बघा.. अन्यथा  खरं जीवन जगण्याचं समाधान आपण गमवून बसू !!

चेहरे की हसी से हर गम छुपालो,
बहोत कुछ बोलना पर कुछ ना छिपाना l
खुद ना रुठो सबको मनाओ,
राज है जिंदगी बस जिते चले जाओ l

प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
9021172362
       

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?