गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा : गुरु शिष्य परंपरेचा गौरव 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेवो महेश्वरा
गुरु :साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः

   आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी संपूर्ण देशात गुरूंची पुजा केली जाते.महाभारत रचते महर्षी व्यासांच्या काळापासून गुरुपौर्णिमेची परंपरा चालतं आलेली आहे. भारतीय  संस्कृतीत गुरूला परमेश्वरापेक्षाही मोठं स्थान दिल्या जात.  रामायण, महाभारताच्या काळापासून गुरु शिष्य परंपरा अस्तित्वात आली जी निरंतर टिकून आहे. मानवी जीवनात गुरु शिवाय मार्ग नाही.  गुरु हा मानवी जीवनाला सुवर्णमय करणारा परीस होय.  ज्याच्या सद्गुणी स्पर्शामुळे मानवी जीवन सुसंस्कृत होते. गुरूला परमेश्वरापेक्षाही उच्च कोटीचे स्थान प्राप्त झाले आहे. यामुळे गुरु शिष्याच हे नातं अमौलिक समजल्या जात. 
   शिक्षकास पूर्वी 'आचार्य ' म्हणतं, आचार्य म्हणजे आचारवान. स्वतः आदर्श जीवन आचरणात आणून विद्यार्थांकडून आचरवून घेणारा तो आचार्य. तर वेदामध्ये गुरूला अत्यंत शक्तिशाली मार्गदर्शक व अज्ञान दूर करणारा असं म्हटलं आहे. 
खरा गुरु  तोच जो मानवी  जीवनातील  अंधकार दूर करतो. म्हणून प्रत्येकांच्या जीवनात गुरूला असाधारण असे महत्व आहे.  'गरु' या शब्दाची व्याप्ती अमर्यादित आहे. आपण जीवनात कुणालाही आपला गुरु करू शकतो. गुरु आपले आईवडील असू शकतात.धर्मगुरू असू शकतात. आपलं आराध्य दैवत असू शकतं किंवा आपल्या आजूबाजूला जे  आदर्श व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्या जीवनाला प्रतिकूल परिस्थिती घडविले असे व्यक्तिमत्वही आपले गुरु ठरू शकतात. म्हणजे जे जे आपल्या जीवनाला योग्य मार्गस्त करू शकतात. योग्य मार्गदर्शन करू शकतात , योग्य संस्कार टाकू शकतात, चांगल्या वाईटाची समज देऊ शकतात ते ते 'गुरु' या शब्दाला पूरक ठरू शकतात.  त्यामुळे आपण गुरु या शब्दाला  धर्मगुरू व देव्हाऱ्यातील देवापुरते मर्यादित करू  शकतं नाही. गुरुची व्याप्ती अथांग आहे. त्याचा विस्तार मर्यादित नसतोच. सांगण्याचा अर्थ म्हणजे जे आपल्या जीवनात आदर्श ठरतात, प्रेरणा देतात ते आपले गुरु असू शकतात.  जीवनातील पहिला गुरु म्हणजे आपले आईवडील जे आपल्या जीवनाला खरा आकार देतात. जन्माला आल्यानंतर चालायला, बोलायला शिकवितात, योग्य ते  संस्कार टाकतात.त्यानंतर 
शिक्षक आपल्या  जीवनातील महत्वाचा गुरु असतो.  एक आदर्श गुरु जीवनाच्या खडतर मार्गावर विद्यार्थांना योग्य मार्गस्त करतो.विद्यार्थ्यांच्या कार्यसिद्धीस बळ देतो. आत्मविश्वासास उभारी देतो.  स्वयंसिद्धतेचे आत्मनिर्भरतेचे धडे देतो. योग्य प्रेरणा देतो, आपले आदर्श आपल्यापुढे  ठेवतो. खरा गुरु  राष्ट्र उभारणीच्या कार्यात  महत्वाचा समजल्या जातो. कारण येणाऱ्या अनेक नवपिढ्याचे उत्तरदायित्व त्यांच्यावर निर्भर असते.  काळाच्या ओघात जरी गुरु शिष्य परंपरेत  आमूलाग्र बदल  घडून आले असले तरीही गुरुची जवाबदारी कुठलाही संगणक पूर्णपणे हाताळू शकला नाही. कारण संगणक ज्ञान, बुद्धी समृद्ध करू शकतो पण त्या ज्ञानाला आकार देत संस्काराची रुजवणूक जर कोणी करू शकतं असेल तर तो म्हणजे फक्त गुरु होय. 
          जीवनात आईवडिलानंतर जर कुणी  संस्काराची , संस्कृतीची, मुल्याची रुजवणूक करीत असेल तर तो म्हणजे गुरु  होय.म्हणून प्लेटो म्हणतो,
"आदर्श राज्याच्या निर्मितीत शिक्षकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो."
    कारण मानवी जीवन अनुकरणशील असते इथे 'दिसतं तसं रुजतं' म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात आवड, जिज्ञासा,आत्मविश्वासाची उर्मी निर्माण करू शकतं असेल तर तो गुरु  होय. मानवी जीवनाला  ज्ञानाबरोबरच मानवी मूल्यभाव देण्याची, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची त्यांच्या विचारविश्वाला आकार देण्याची ताकत फक्त गुरुकडे असते.  आणि म्हणूनचं  गुरु  हा केवळ ज्ञानदाता असून भागत नाही तर त्याला माणूस बनविणारा शिल्पकार बनावा लागतो .विकसित राष्ट्राची निर्मिती जर व्हायची असेल तर  त्या देशाचा प्रत्येक व्यक्ती एक उत्तम नागरिक होणं गरजेचं आहे.त्यामुळे प्रत्येकांच्या जीवनात त्यांना लाभलेले गुरु हे आदर्शव्रत असले पाहिजे. 
     आजची सामाजिक परिस्थिती अतिशय विदारक आहे. देव, धर्म, जात यात आपण वाटले जात आहोत.धर्माच्या नावावर कलुषित विचारांची पेरणी नवपिढीच्या डोक्यात रुजवली जात आहे. देशात धर्म गुरूंची होणारी हत्या याचेच घोतक आहे. मनात, विचारात धर्म द्वेषाचे विष कालवून तरुणाईच्या हातात शस्त्र देऊन त्यांना दिशाहीन करण्याचे, देशात अराजकता माजवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे.  धर्माधर्माचे वाद निर्माण करून, देशातील भाईचारा नष्ट करण्याची दुष्ट प्रवृत्ती वाढीस  लागली आहे.  माणसातील प्रेमाचा ओलावा नष्ट व्हायला लागला आहे. याचे महत्वाचे कारण हेच की काही धर्मदाय प्रवृत्ती स्वतःला गुरु समजून नासमज तरुणांना अयोग्य मार्गावर चालण्यास प्रवृत्त करीत आहे.
     जीवनाला सकारात्मक बघण्याची व आत्मविश्वाची रुजवणूक करण्याची महत्वपूर्ण जवाबदारी गुरुची असते . प्रेम, प्रज्ञा, करुणा, शील, विनम्रता, मानवता, सहृदयता या सर्व नीतिमूल्यांची रुजवणूक  जर कुणी करू शकतं असेल तर तो म्हणजे गरु  होय म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात एक आदर्श गुरु जोपासायला हवा.दिशाहीन गुरु हा आपल्याला अराजकतेच्या खाईत लोटू शकतो हे आपण समजून घ्यायला हवेत!

'अविवेकाची काजळी l झाडुनि विवेकदीप उजळी l योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll'
    असे संत ज्ञानेश्वर सांगून गेले. तोच गुरु  रुपी ज्ञानदीप अविरत तेवायला  हवा.आपल्या थोर संस्कृतीत गुरूंची महिमा अथांग आहे. तथागत गौतम बुद्धाने जगाला शांतीवंदना दिली जी आताही जगात आत्मसात करायला परिपूर्ण आहे.म्हणून तथागत भगवान बुद्धांसारखे गरु आज निर्माण व्हायला हवेत.   संतगुरुंनी परमार्थ आणि प्रपंचाची शिकवण देतं लोकांना मानवतेचा संदेश दिला. मानवता हाच धर्म श्रेष्ठ असतो.अशी शिकवण दिली आजही 'गुरुमाऊली' या निनादाने अवघी पंढरी गजबजते. गुरूंची महिमा, शिकवण डोक्यावर घेत  'जय जय राम कृष्ण हरी ' च्या जयघोषात अफाट भक्तीचा सागर एकतेचा, परंपरेचा वसा सांभाळतान दिसतात.  असे संतगुरु आज निर्माण व्हायला हवेत. युगपुरुष  छत्रपती शिवाजी महाराज जे युवा सामर्थ्याचे प्रतीक आहे. आजही अवधी तरुणाई त्यांना आपले  आदर्श गुरु मानतात  'जय शिवाजी' च्या नावाने नामघोष करतात ते त्याच्या कार्य, कर्तुत्व आणि शिकवणुकीमुळेच !असे शिवाजी आज घडायला हवेत. आदर्श शासनव्यवस्था  कशी असावी, रयतेचा स्वामी कसा असावा, यासाठी एकविसाव्या शतकात आजही ते  प्रेरक ठरतात. सानेगुरुजी  सर्व समाजातील लोकांना विद्येच माहेर घरं खुले करून देतात तर महात्मा फुले शेतकऱ्यांपासून, दिनदलितांचे कैवारी बनतात.  महिलांचा  आत्मविश्वास जागविणाऱ्या सावित्राबाई फुले आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भव्यदिव्य उज्ज्वल राष्ट्राचं स्वप्नं बाळगतात. समतेचे नवविचार समाजात रुजवतात अशा आदर्श गुरूंची आज देशाला गरज आहे.  डॉ.आंबेडकरांसारखे माहामानव असंख्य मानवजातीला न्याय मिळवून देणारे प्रणेते ठरतात. समता, बंधुता, न्याय यासाठी समान हक्क आणि अधिकार न्यायाने मिळवून देण्यास झटतात असे विचार आज देशाला हवेत.आधुनिक राष्ट्राचे शिल्पकार, भारतरत्न, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सारख्या आदर्शशाली गुरूंची आपल्याला आज गरज आहे. असेच गुरु राष्ट्रउन्नतीचा ठेवा बनू शकतात. अशा गुरूंची आज देशाला गरज आहे.ती परंपरा आपण जोपासायला हवी. 

प्रा. वैशाली रितेश देशमुख 
रा. कुही, नागपूर 
9021174362

प्रा. वैशाली रितेश देशमुख 
रा. कुही, जि. नागपूर 
7420850376

    

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?