आत्मनिर्भरतेचा संकल्प !

      आत्मनिर्भरतेचा संकल्प !

    जगभरात लक्षावधी लोकांचा बळी घेणारा कोरोना व्हायरस, कधीच संपुष्ठात येणारं नाही, त्यामुळे जगाला आता या विषाणूंसोबतच जगणे शिकावे लागेल. असे संकेत  जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी नुकतेच व्यक्त केले आहे. त्यानुसार  आता सहजासहजी कोरोना संपुष्टात येईल असे वाटतं नाही.सध्याचा कोरोना बळी रुग्णाचा आकडा बघितला तर तो अवाक करणारा आहे. तीन लाखाच्या वर सरकलेला आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पादुर्भावामुळे आणखी किती लोकांचा बळी जाईल हे सांगता येतं नाही. जागतिक पातळीवर कोरोनावर मात करता येईल असा ठोस उपाय अध्यापही गवसलेला नाही. 
         आपण इतिहासाला  चाळून बघितले  तर संसर्गजन्य रोग यापूर्वीही जगाने अनेकदा अनुभवले दिसून येते . याआधीही  प्लेग, देवी, साथीचा ताप, साईन फ्लू अशा अनेक संर्गजन्य रोगाचा पादुर्भावाने जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे . उदाहरण द्यायचे झाले तर. इ. स. 1347ते 1351 या कालावधीत  प्लेगच्या साथीमुळे आशिया,युरोप, आफ्रिका या खंडात प्रचंड मानवहानी झाली होती. या काळात जगाची लोकसंख्या 45 कोटीवरून 37कोटीपर्यंत कमी झाली होती. असा उल्लेख मिळतो. यावरून जगाने असे कित्येक नरसंहार संर्गजन्य रोगाचे भयाण रूप अनुभवलेले आहे. तरीही जगाने पुन्हा स्वतःला सावरलेलं दिसून येतं !

        आजही कोरोनासारख्या बिकट नरसंहार संकटाला भारतासह संपूर्ण जग तोंड देतं आहे. या संकटातून निघावं कसं?यावरही  विविध शोध,चर्चा, संशोधने आणि वेगवेगळी साधने तयार केले जातं आहे. यातून निश्चितच संपूर्ण जग सावरेल अशी आशाही व्यक्त केली जातं आहे. पण तोपर्यंत देशातील  समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था सावरणे गरजेचे आहे. देशातील अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी नुकताच वीस लाख कोटीचा पँकेज घोषित केला गेला. जे तळागाळातील लोकांसाठी दिलासा देणारा आहे. तसेच माननीय पतंप्रधानांनी जनतेला केलेलं  'आत्मनिर्भरतेचे ' आवाहन पुढील संकटाच्या काळासाठी योग्य दिशादर्शक ठरणारं आहे. 

कहदो मुश्किलों से थोडा और कठीण हो जाए l

कहदो चुनौतीयों से थोडा और कठीण हो जाए l

अगर नापना चाहता है, हमारी हिंमत तो, 

कहदो आसमान से थोडा और उप्पर हो जाए l

             वरील ओळी आत्मनिर्भर होण्यास निश्चितच बळकट ठरणाऱ्या आहे. आत्मनिर्भर,  स्वयंपूर्ण,स्वावलंबी  हे तिन्ही शब्द एकमेकांना पूरक आहेत.ज्यावरून आपल्याला  स्वत:च्या, स्वयंसिद्धतेचा, स्वयंपूर्णतेचा, स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा पूल बांधता येतो. जो आता प्रत्येक भारतीयांसाठी महत्वपूर्ण आहे.आज सर्व क्षेत्रातील कारोबार, व्यापार, उत्पादने, खरीददार कडीकुलुपात बंदिस्त आहे. देशातील अर्थव्यवस्थेची कडी विस्कळीत झाली असून त्याचे दूरगामी परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहे. उद्योगक्षेत्रे बंद असल्यामुळे कामगार, मजुरदार, खरीददार वर्ग बेजार झालेले  आहे. त्यामुळे बेरोजगारीचा,उपासमारीचा फटका गरीब, मजूर लोकांना सर्वात जास्त बसलेला आहे. त्याच्या हालबेहालीच्या  करूनकहाणीचे दृस्य, हृदय हेलवणारे आहेत. पोटाची भूक, स्वकीयांची ओढ आणि आर्थिक चणचणीत होरपळलेला मजूर, गरीबवर्ग जे भेटेल त्या साधनाने, पायवाटेने प्रवास करतांना दिसतो आहे. यात अनेक बेसाह्य मजुरांनी आपले जीव सुद्धा गमावलेले आहे.काळीज हेलावून टाकणारे हे दृश्य आपण बघतोच आहोत. 

             या सर्व विदारक परिस्थितून आज आपल्याला निघता आले नाही, तर समोरचे भविष्य मात्र  अंधारलेले असेल यात शंका नाही! या परिस्थितीला नियंत्रित ठेवायचे असेल तर देशातील अर्थव्यवस्था सावरणे, तिला बळकट करणे, गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करणे, परदेशी वस्तूंचा बहिष्कार करणे गरजेचे आहे.  स्वदेशी वस्तू, ग्रामउद्योगाला चालना देणे, देशातील उत्पादन वस्तूची खरेदी विक्री योग्य भावात करणे, कृषी विभागाला प्राधान्य देतं शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देणे, लहानमोठया उद्योगांना चालना देणे, आपल्या देशातील वस्तू खरेदीला प्राधान्य देणे,मजुरदारांना कामाचा योग्य मोबदला देणे हे महत्वाचे आहे.हे सगळं करतांना कोरोनाच्या संकटाला सावधतेने हाताळनेही गरजेचं राहिलं. परकीय देशातील आकर्षित वस्तू आपल्याला भुरळ पाडतात, त्यामुळे इतर देशातील अर्थव्यवस्था समृद्ध होते,पण  आपल्या देशातील अर्थव्यस्थेला मात्र तडा जातो.  आज चीनकडून आपण अनेक वस्तूंची, कच्या मालाची आयात करतो....यात  इलेक्ट्रॉनिक वस्तू, खते, कीटकनाशके, औषध निर्माण करण्याची रसायने यासह असंख्य वस्तूंची आयात  एकट्या चीन मधून केला जातो.  पण याचं वस्तूंच उत्पादन जर आपल्या देशात तयार झाले, आणि आपल्याच देशातील वस्तूंचा वापर जर आपण केला तर आपल्या देशाला आयातीचा आर्थिक फटका बसणार नाही.त्यामुळे  या वस्तूंच्या उत्पदनाची बाजारपेठ आपल्याच देशात तयार व्हावी यासाठी सर्वोतोपरीने प्रयत्न करायला हवे! तरचं आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकेल. 

चलता रहुंगा पथ पर 

चलने में माहिर हो जाऊंगा, 

या तो मंजिल मिल जायेगी.. 

या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा 

       कोरोनाच्या या युद्धात आपण हतबल तर झालो आहोतच पण असे अस्थिर जीवन किती दिवस जगणार आहोत? मानवी जीवनाला गतिशीलता येणे गरजेचे आहे. मानवीजीवन एका जागेवर स्थिर झाले, तर पुढील काळात निर्माण होणारे अनेक प्रश्नच आपल्याला जगू देणार नाही. म्हणून कोरोनाच्या या संकटकाळात प्रत्येकांनी सुरक्षतेची जवाबदारी उचलून, स्वतःला मजबूत करणे, खंबीर करणे तेवढेच महत्वाचे ठरते !

प्रा. वैशाली रितेश देशमुख 

रा. नागपूर 

9021172362

    जगभरात लक्षावधी लोकांचा बळी घेणारा कोरोना व्हायरस, कधीच संपुष्ठात येणारं नाही, त्यामुळे जगाला आता या विषाणूंसोबतच जगणे शिकावे लागेल. असे संकेत  जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी नुकतेच व्यक्त केले आहे. त्यानुसार  आता सहजासहजी कोरोना संपुष्टात येईल असे वाटतं नाही.सध्याचा कोरोना बळी रुग्णाचा आकडा बघितला तर तो अवाक करणारा आहे. तीन लाखाच्या वर सरकलेला आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पादुर्भावामुळे आणखी किती लोकांचा बळी जाईल हे सांगता येतं नाही. जागतिक पातळीवर कोरोनावर मात करता येईल असा  कुठलाच ठोस उपाय गवसलेला नाही. 
         आपण इतिहासाला  चाळून बघितले  तर संसर्गजन्य रोग यापूर्वीही जगाने अनेकदा अनुभवले दिसून येते . याआधीही  प्लेग, देवी, साथीचा ताप, साईन फ्लू अशा अनेक संर्गजन्य रोगाचा पादुर्भावाने जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे . उदाहरण द्यायचे झाले तर. इ. स. 1347ते 1351 या कालावधीत  प्लेगच्या साथीमुळे आशिया,युरोप, आफ्रिका या खंडात प्रचंड मानवहानी झाली होती. या काळात जगाची लोकसंख्या 45 कोटीवरून 37कोटीपर्यंत कमी झाली होती. असा उल्लेख मिळतो. यावरून जगाने असे कित्येक नरसंहार संर्गजन्य रोगाचे भयाण रूप अनुभवलेले आहे. तरीही जगाने पुन्हा स्वतःला सावरलेलं दिसून येतं !

        आजही कोरोनासारख्या बिकट नरसंहार संकटाला भारतासह संपूर्ण जग तोंड देतं आहे. या संकटातून निघावं कसं?यावरही  विविध शोध,चर्चा, संशोधने आणि वेगवेगळी साधने तयार केले जातं आहे. यातून निश्चितच संपूर्ण जग सावरेल अशी आशाही व्यक्त केली जातं आहे. पण तोपर्यंत देशातील  समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था सावरणे गरजेचे आहे. देशातील अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी नुकताच वीस लाख कोटीचा पँकेज घोषित केला गेला. जे तळागाळातील लोकांसाठी दिलासा देणारा आहे. तसेच माननीय पतंप्रधानांनी जनतेला केलेलं  'आत्मनिर्भरतेचे ' आवाहन पुढील संकटाच्या काळासाठी योग्य दिशादर्शक ठरणारं आहे. 

कहदो मुश्किलों से थोडा और कठीण हो जाए l

कहदो चुनौतीयों से थोडा और कठीण हो जाए l

अगर नापना चाहता है, हमारी हिंमत तो, 

कहदो आसमान से थोडा और उप्पर हो जाए l

             वरील ओळी आत्मनिर्भर होण्यास निश्चितच बळकट ठरणाऱ्या आहे. आत्मनिर्भर,  स्वयंपूर्ण,स्वावलंबी  हे तिन्ही शब्द एकमेकांना पूरक आहेत.ज्यावरून आपल्याला  स्वत:च्या, स्वयंसिद्धतेचा, स्वयंपूर्णतेचा, स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा पूल बांधता येतो. जो आता प्रत्येक भारतीयांसाठी महत्वपूर्ण आहे.आज सर्व क्षेत्रातील कारोबार, व्यापार, उत्पादने, खरीददार कडीकुलुपात बंदिस्त आहे. देशातील अर्थव्यवस्थेची कडी विस्कळीत झाली असून त्याचे दूरगामी परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहे. उद्योगक्षेत्रे बंद असल्यामुळे कामगार, मजुरदार, खरीददार वर्ग बेजार झालेले  आहे. त्यामुळे बेरोजगारीचा,उपासमारीचा फटका गरीब, मजूर लोकांना सर्वात जास्त बसलेला आहे. त्याच्या हालबेहालीच्या  करूनकहाणीचे दृस्य, हृदय हेलवणारे आहेत. पोटाची भूक, स्वकीयांची ओढ आणि आर्थिक चणचणीत होरपळलेला मजूर, गरीबवर्ग जे भेटेल त्या साधनाने, पायवाटेने प्रवास करतांना दिसतो आहे. यात अनेक बेसाह्य मजुरांनी आपले जीव सुद्धा गमावलेले आहे.काळीज हेलावून टाकणारे हे दृश्य आपण बघतोच आहोत. 

             या सर्व विदारक परिस्थितून आज आपल्याला निघता आले नाही, तर समोरचे भविष्य मात्र  अंधारलेले असेल यात शंका नाही! या परिस्थितीला नियंत्रित ठेवायचे असेल तर देशातील अर्थव्यवस्था सावरणे, तिला बळकट करणे, गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करणे, परदेशी वस्तूंचा बहिष्कार करणे गरजेचे आहे.  स्वदेशी वस्तू, ग्रामउद्योगाला चालना देणे, देशातील उत्पादन वस्तूची खरेदी विक्री योग्य भावात करणे, कृषी विभागाला प्राधान्य देतं शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देणे, लहानमोठया उद्योगांना चालना देणे, आपल्या देशातील वस्तू खरेदीला प्राधान्य देणे,मजुरदारांना कामाचा योग्य मोबदला देणे हे महत्वाचे आहे.हे सगळं करतांना कोरोनाच्या संकटाला सावधतेने हाताळनेही गरजेचं राहिलं. परकीय देशातील आकर्षित वस्तू आपल्याला भुरळ पाडतात, त्यामुळे इतर देशातील अर्थव्यवस्था समृद्ध होते,पण  आपल्या देशातील अर्थव्यस्थेला मात्र तडा जातो.  आज चीनकडून आपण अनेक वस्तूंची, कच्या मालाची आयात करतो....यात  इलेक्ट्रॉनिक वस्तू, खते, कीटकनाशके, औषध निर्माण करण्याची रसायने यासह असंख्य वस्तूंची आयात  एकट्या चीन मधून केला जातो.  पण याचं वस्तूंच उत्पादन जर आपल्या देशात तयार झाले, आणि आपल्याच देशातील वस्तूंचा वापर जर आपण केला तर आपल्या देशाला आयातीचा आर्थिक फटका बसणार नाही.त्यामुळे  या वस्तूंच्या उत्पदनाची बाजारपेठ आपल्याच देशात तयार व्हावी यासाठी सर्वोतोपरीने प्रयत्न करायला हवे! तरचं आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकेल. 

चलता रहुंगा पथ पर 

चलने में माहिर हो जाऊंगा, 

या तो मंजिल मिल जायेगी.. 

या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा 

       कोरोनाच्या या युद्धात आपण हतबल तर झालो आहोतच पण असे अस्थिर जीवन किती दिवस जगणार आहोत? मानवी जीवनाला गतिशीलता येणे गरजेचे आहे. मानवीजीवन एका जागेवर स्थिर झाले, तर पुढील काळात निर्माण होणारे अनेक प्रश्नच आपल्याला जगू देणार नाही. म्हणून कोरोनाच्या या संकटकाळात प्रत्येकांनी सुरक्षतेची जवाबदारी उचलून, स्वतःला मजबूत करणे, खंबीर करणे तेवढेच महत्वाचे ठरते !

प्रा. वैशाली रितेश देशमुख 

रा. नागपूर 

9021172362

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?