कठोर कायदे काळाची गरज
कठोर कायदे काळाची गरज ...
महिलांच्या व लहान मुलांच्या स्वरक्षणार्थ आंध्रप्रदेश सरकारने नवा कायदा आणण्याची तयारी नुकतीच दर्शवली जी निश्चितच स्वागतार्य आहे .या नव्या कायद्याच्या अंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला 21दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली आहे .ज्यामुळे निर्दयतेने अत्याचार करून खून करणाऱ्या कसाई गुन्हेगारी प्रवृतीस आळा बसेल .बुधवारला आंध्रप्रदेशाच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे .यानंतर महाराष्ट्रातही काही मंत्र्यांनीही या कायद्याला दुजोरा दिला . या कायद्यामुळे बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमांना 21दिवसात कायद्याच्या अंतर्गत पळताळणी करून फाशीची शिक्षा देण्यात येणारं आहे .हा कायदा संपूर्ण समाजाला योग्य न्याय देणारा असून तो संपूर्ण राज्यात लागू करायची मागणी आता जोर धरू लागली आहे .
देशात सुरु असलेल्या महिला बलात्काराचे व खुनाचे प्रमाण दिवसेनदिवस वाढीस लागल्यामुळे असे कठोर कायदे अमलात येणे गरजेचे आहे.
निर्भया ,कठुआ ,उन्नाव ,हैद्राबाद व नागपूर येथील लिंगा गावात पाच वर्षाच्या मुलीसोबत जो अमानवी प्रकार घडला तो अक्षम्य आहे . कोर्याची सीमा गाठणाऱ्या अशा नराधमांना जगण्याचा मुळीच अधिकार नसावा .ज्या पद्धतीने इतक्या निर्दयतेने मर्यादेचा कळस गाठत हे कृत्य केले जाते .त्या नराधमांना कुठलीही माफी नसावी .त्यांना लवकरात लवकर फासावर लटकवल्या जावं, हेच न्यायनिष्ट असलं पाहिजे याच अनुषंगाने हा कायदा बनला असावा .कोर्टाच्या दिरंगाईमूळे व न्यायव्यवस्थेच्या संथ प्रक्रियेमुळे थांबलेले प्रकरण अशा कायद्यामुळे निकाली लागू शकतात .यामूळे पीडितेच्या परिवालाही लवकरात लवकर न्याय मिळेल.यात शंका नाही .
नुकत्याच झालेल्या हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणात हैद्राबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमूळे न्याय मिळाल्याचा आनंद व समाधान संपूर्ण समाजमनात उमटला .कुणी कायद्याच्या बाजूने या घडनेची निंदा केली असली; तरीही अनेकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव करून ,राखी बांधून ,मिठाई भरवून हा आनंद व्यक्त केला .निश्चितच संपूर्ण समाजमनाला अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर सजा मिळावी हे अपेक्षित असते .
गेल्या काही वर्षात हजारोच्या संख्येने स्त्री बलात्काराचे प्रकरण पोलीस खात्यात जमा असल्याचे आकड्यावरून समजतात .स्त्री बलात्कार व खुनाचे प्रकरण वर्षोनवर्ष न्यायालयात चालतात .निर्भया अत्याचार व खून प्रकणाचा निवाडा लागायला सात वर्ष उलटलेत ,असे कित्येक प्रकरणे असतील जे वर्षानुवर्षे न्यायालयात चालतात .काही गुन्हेगार पुराव्या अभावी सुटतात . पण या राक्षसी कृत्यामूळे जीव गेलेल्या मुलीच्या आईवडिलांना मात्र रोज मरणंयातना सहन कराव्या लागतात .आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी दिवसरात्र कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यात त्यांच उरलंसुरलं बळही संपते पण त्यांना लवकर न्याय मिळतं नाही .
खरं तर आंध्र प्रदेशातील या नव्या कायद्याप्रमाणे इतर राज्यातही हा कायदा लागू झाला तर गुन्हेगाराला नक्कीच चोप बसेल .एकवीस दिवसात फासी झालेल्या गुन्हेगाराला बघून असे गुन्हे करणाऱ्यांना नक्कीच कुठेतरी खीळ बसेल पुन्हा असे अमानवीय कृत्य करण्यासाठी त्यांची हिंमत होणार नाही .त्यासाठी हा कायदा अमलात आणायला हवा .
गेल्या काही दिवसात रोज बलात्काराच्या बातम्या वृत्तपत्रात झळकतात .बालिकेच वय ,निरागसता बघून मन ओलावत .किती निर्दयतेने पुरावा नष्ट करतांना त्यांचा जीव घेतला जातो .अमानुषतेने कृत्य करणाऱ्या या नराधमांना तितक्याच क्रूरतेने फासावर लटकाव यासाठी अवघ समाजमन पुढे येत .मोर्चे काढले जातात , निदर्शने घोषणा ,जाळपोळ करून लोकमनाचा रोष व्यक्त होतो .ज्या नराधमांनी हे कृत्य केले असते ,तेही तर स्त्री देहातून जन्म घेऊन आलेले असतात ना ..याचं देशात त्यांचाही जन्म झालेला असतो ..याचं संस्कृतीत ते वाढलेले असतात. मग त्यांना मानवाचा दानव कुणी केला असावा .अजान ,निष्पाप मुलींना संपवून त्यांना काय मिळालं असावं
,दुसऱ्याचं जीवन संपवून टाकणारी मानसिकता आपल्या देशात आली तरी कुठून असावी ..असे दुष्कृत्य करतांना त्यांचे हात का कापत नसावे का ?भारतीय लोकशाही ही माणूस घडवायला अयशस्वी तर ठरतं नाही ना ?... अत्याचार केल्यानंतर दगडाने ठेचून ,जाळून टाकण्याइतकी , मानवी अंग कापून टाकणाऱ्यापर्यँतची दुष्ट प्रवृत्ती कशी तयार होत असावी? ..यमदूताची मानसिकता संपणार तरी कधी ?असे एक ना अनेक या प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात .
या महिन्यात नागपूर जिल्हात एकापाठोपाठ पाच बलात्काराच्या घटना घडल्या . रोज घडणाऱ्या बलात्काराच्या घडणेमुळे आपल्या देशातील प्रतिमा मलीन होत चालली आहे .जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीची जी छाप होती त्यावर आता निरपराध ,निष्णात ,निरागस मुलींचे ,महिलांच्या आक्रोशाच्या खुणा उमटायला लागल्या आहे .त्यामुळे भारतीय संस्कृतीला कलंकित करणाऱ्या अशा घटनांना खीळ बसवायची असेल तर कठोरातले कठोर कायदे आपल्या देशात राबवायला हवे .एवढेच नाही तर अशा दुष्ट प्रवृत्तीला वाढविण्यास जवाबदार असणाऱ्या सर्व गोष्टीला समाजातून नष्ट करायला हव्यात .आज अनेक तरुण पॉर्न सारख्या ,मनाला कलुषित करणाऱ्या ,उत्तेजित करणाऱ्या नेटसाईड च्या माध्यमातून अनेक घाणेरडे दृश्य बघतात .यावरही बंदी आणायला हवी .महिलांच्या सुरक्षणार्थ अनेक उपाययोजना राबवायला हव्यात .नुकत्याच महिला स्वरक्षणार्थ राबवलेल्या गेलेल्या फोन क्रमांकाची कडक अंलबजावणी व्हायला हवी .स्त्रियांना आपल्या देशात सुरक्षित वाटावं यासाठी अनेक सुरक्षाकवच निर्माण व्हायला हवे.देशातील स्त्री सन्मानासाठी घरातील प्रत्येक व्येक्तीपासून सुरवात व्ह्ययला हवी .समाजातील प्रत्येक स्त्रियांकडे सन्मानाने बघायला हवे .कायदा कठोर होणे तर गरजेचे आहे .पण समाजातील दुष्ट प्रवृत्ती समाजातून पूर्णपणे नष्ट करायची असेल तर घराघरातून स्त्रियांच्या स्वरक्षणार्थ आपण सजग असणे तितकेच गरजेचे आहे .
प्रा .वैशाली रितेश देशमुख
ता .कूही ,जि .नागपूर
9021172362
Comments
Post a Comment