शिक्षणक्षेत्रातील शिक्षकांची होणारी परवड
Lशिक्षणक्षेत्रातील शिक्षकांची होणारी परवड .....
मागता येईना भीक तर मास्तरकी शिक ....अशी म्हणं पूर्वी फार प्रचलित होती. शिक्षक म्हणजे सर्वांत सुखी प्राणी त्याला उत्तम पगार मिळतो ,मनसोक्त सुट्टया मिळतात ,अशी धारणा समाजात होती .सर्वांत सुखी ,संपन्न कोण ?तर शिक्षक..असंच उत्तर मिळायचं पण येत्या काही वर्षात मास्तरकी शिक आणि मांग भीक... अशी अवस्था शिक्षकांची झालेली दिसून येत आहे . शिक्षणक्षेत्रातील बदलत्या धोरणामुळे आणि विद्यार्थी आणि पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचा कल वाढल्यामुळे शिक्षणक्षेत्रातील बदल झपाट्याने होतं आहे .त्यामुळे लाखोच्या संख्येने कार्यरत असलेले मराठी माध्यमातील शिक्षक चिंताग्रस्त जीवन जगतांना दिसून येत आहे .पूर्वी मराठी माध्यमाच्या शाळा तुडूंब भरून राहायच्या .विद्यार्थी ,शिक्षक आणि पालकांचं नातं संस्कृती संवर्धक असायचं .पिठ्यानंपिढ्या गुरुशिष्य परंपरेत समाज बांधल्या गेला होता .शिक्षक जे म्हणेल ती उजवीबाजू येवढी शिक्षकांची विश्वासाहर्ता होती .पण म्हणतात ना काळानुसार वेळही बदलतो...इंग्रजी शिक्षणप्रणालीच्या वाढत्या लोकप्रियतेपुढे मराठी शाळा आता हळूहळू जमीनदोस्त व्हायला लागल्या आहे .ही वेळ का यावी ?याला जवाबदार कोण ?याचे अनेक कारणे असतील... पण यात शिक्षकमात्र पूर्णतः भरडला जातं आहे हे नक्की...शिक्षकाच्या मनाची होणारी परवड ,सतत कुटूंबाची व भविष्याची होणारी चिंता यामुळे शिक्षक दिवसेनदिवस चिंताग्रस्त होतं असून तो नैराश्याच्या दिशेने जाण्याची संभावना व्यक्त केली जातं आहे .
शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी पटसंख्येवर शिक्षकांची संख्या निर्धारीत होतं असते त्यामुळे संचमान्यता होतं असतांना नियमानुसार प्रत्येक वर्गातील विद्यार्थीसंख्येवर त्या त्या शाळेतील शिक्षकांचं भवितव्य अवलंबून असते पण गेल्या काही वर्षांपासून मराठी माध्यमाकरिता विद्यार्थी आणि पालकांनी मराठी शाळेकडे पाठ फिरवल्यामुळे अनेक शाळा ओस पडलेल्या असून,त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन कुठे होणार ?होणार की नाही ?या दडपणाखाली सतत शिक्षक जगतो आहे .जे हाल आतापर्यंत जिल्हा परिषदच्या शिक्षकांचे होते तेच हाल माध्यमिक आणि उच्यमाध्यमिक शाळेतील शिक्षकांचे आहे .नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालानंतर उच्यमाघ्यमिक शाळेतील शिक्षकाचे भवितव्य टांगणीला लागले असून बिनाअनुदानित शिक्षकाचे भवितव्य परिपूर्णतेने अंधारमय झालेले आहे.आठ ते वर्षापासून कमी वेतनामध्ये काम करून एकदिवस शंभर टक्के अनुदान येईलच या आशेपोटी जगणारा शिक्षक आज पूर्णतः कोलमडून गेला आहे .
इयत्ता नववी पर्यँत विद्यार्थी पासचे धोरण गेल्या काहीवर्षांपासून राबविण्यात येत आहे .त्यामुळे विद्यार्थ्याला ढ येत नसतांनाही तो दहावीला जातो ...विद्यार्थानाही अभ्यास न करण्याची सवय याचं धोरणामुळे लागली पण यावर्षी दहावीत सरसकट भाषाविभागातील तोंडी गूण बंदचे धोरण राबविल्यामूळे दहावीत पास होणार्यांची संख्या फारच घसरली .माणूस हा सवयीचा गुलाम असतो त्यामुळे आपण पास होऊच ! या मानसिकतेत राहून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे फारस लक्ष दिलं नाही आणि त्याचाच परिणाम नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात दिसून आला . इंग्रजी ,हिंदी आणि मराठी विषयात हजारोच्या संख्येने विद्यार्थी नापास झालेत .यात नागपूर विभागातील सर्वच माध्यमातील मराठी या विषयाचा निकाल फक्त 65.3%लागला असून सुमारे 35%विद्यार्थी मराठी विषयात फेल ठरलेले आहे .यावरून मराठी भाषेचा दर्जा कितपत खालावत चाललेला आहे याचा अनुमान आपल्याला लावताI येईल .त्यामुळे त्याची झळ अकरावीच्या विद्यार्थी संख्येवर बसली असून उच्चमाध्यमिक शिक्षकांवर आता अतिरिक्त होण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे .त्यामुळे शिक्षक हा कायम दडपणाखाली जीवन जगतं असून तो चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे .विद्यार्थीसंख्या वाढविण्यास विद्यार्थी शोध भटकंती सद्या शिक्षकांची सुरू असून त्याला खेडोपाडी पायपीट करावी लागतं आहे .या सर्व गोष्टीला जवाबदार कोण ? शिक्षक ?पालक?विद्यार्थी की बदलती शिक्षण प्रणाली ?याचा सारासार विचार करणे तितकंच गरजेचं आहे. शिक्षणक्षेत्रातील बदलत्या धोरणाचाही यात महत्वाचा वाटा असून गल्लोगल्ली ईंग्रजीमाध्यमाच्या शाळेला परवानगी दिल्यामुळे ,मराठी शाळेचा गळाघोट करणे सुरू आहे . या चुकीच्या ध्येय धोरणेमुळे शिक्षकांचे आणि विद्यार्ध्यांचेही भवितव्य अंधकारमय होण्याच्या दिशेवर आहे .
सुरवातीला विज्ञानशाखेतील प्रवेशास किमान 50%गूण आवश्यक असणे गरजेज होतं पण ती अट शिथिल केल्यामुळे व प्रॅक्टिकल मार्क सरसकट 30मिळतं असल्यामुळे 5ते 10गूण घेऊन आपण पास होतोच चा फंडा विद्यार्थांना आता गवसलेला आहे .त्यामुळे प्रमोटेड(ATKT)व 35ते 40टक्के घेतलेले विद्यार्थीही आज विज्ञान शाखेकडे वळलेले दिसून येत आहे .त्यामुळे कलाशाखेतील शिक्षकांची कुचंबणा होतं असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही प्रश्न टांगणीला लागलेला आहे . कलाशाखेविषयीची चुकीची धारणा आणि इंग्रजी माध्यमाची आकर्षकता या मूळे विद्यार्थी दिशाहीन झालेला दिसून आहे .
मराठी ही आपली मातृभाषा असूनही यावर्षीचा मराठी विषयाचा निकाल फारच कमी लागला ,ज्या भाषेला आपण लहानपणापासून जाणतो ,समजतो त्या भाषेत आपण टिकाव धरू शकतं नाही अस असतांना परकीय भाषेत आपण टिकाव धरू शकू का ?या गोष्टीचा विचार आज पालकांनी आणि विद्यार्थांनी करणे गरजेचं आहे .कलाशाखेतून अनेक विद्यार्थी घडले ,मोठं मोठे अधिकारी झालेत.आणि पुढेही होऊ शकतात . स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण होण्याकरिता सर्वात उत्तम कलाशाखेचा मार्ग असूनही या शाखेला इतकी उदासीनता असणं म्हणजे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल .याचा परिणाम शिक्षकावर होतोच परंतु याही पेक्षा गुणवत्ता नसतांनाही जे विद्यार्थी फक्त पास होण्याच्या धारणेपोटी न झेपणाऱ्या शाखेत प्रवेश करतात त्याचं भवितव्य सुद्धा धोक्यात येऊ शकतं हे त्यांना कोण समजवणार ?आणि म्हणून
मराठी माध्यमाच्या शाळा जर टिकवायच्या असतील तर पूर्वग्रहदूषित विचार, शासनाचे वेळोवेळी बदलेले धोरण यात सुधारणा होऊन बुद्धिमत्तेनुसार विद्यार्थांना प्रवेश मिळण्याचे धोरण राबवणे आवश्यक आहे .तरचं या देशातील तरुणांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल आणि शिक्षकांची होणारी परवड थांबेल ...
प्रा .वैशाली रितेश देशमुख
(कनिष्ठ व्याख्याता )
ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय ,कूही
रा .नागपूर ,जिल्हा नागपूर
7420850376
Comments
Post a Comment