ए पी जे अब्दुल कलाम

ए पी जे अब्दुल कलाम एक महान विभूती!

          भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती बुद्धिमान जिज्ञासू जागतिक पातळीवर अवकाश संशोधक म्हणून कीर्तीचे सुवर्ण अक्षरात नाव रेखाटून जाणारे थोर शास्त्रज्ञ, अनुशक्ती क्षेत्रात तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवून 'आकाश', 'पृथ्वी', 'त्रिशूल', 'नाग 'या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे. 'पद्मभूषण ','पद्मविभूषण' आणि 'भारतरत्न' घ्या सर्वोच्च सन्मानांनी विभूषित झालेल्या विभूतींचा जन्म 15 आक्टोंबर 1931 मध्ये रामेश्वर येथे झाला.वडिलांचं नावं जैनुलबदीन तर आईचे नावं आशियम्मा हे होतं. त्यांच्या घराजवळून दहा मिनिटांच्या अंतरावर रामेश्वरातील ऐतिहासिक शिव मंदिर असल्यामुळे त्याचे  कुटूंब हिंदू लोकांशी गुण्यागोविंदाने राहतं. मंदिरातील पुजारी लक्ष्मणशास्त्री हे त्यांच्या वडिलांचे निकटचे मित्र होते. त्यामुळे धार्मिक शिकवणीवरील व श्रद्धेवर तासनतास ते चर्चा करीत.याच चर्चेतून कलमांवर मानवतेचे संस्कार पडत गेले.कलाम दहा वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांनी नौका बांधायचा व्यवसाय स्वीकारला व याचं  नौकेतून ते प्रवाश्यांना  ने-आण करीत त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे.वडिलांकडून बालवयाच  प्रामाणिकपणा व स्वयंशिस्तीचे  योग्य संस्कार तर आईकडून चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती,दयाळू वृत्तीचे संस्कार पडले.
            प्राथमिक शिक्षणानंतर, शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना रामनाथपुरमला जावं लागतं होत.पण आपलं गावं सोडून जायची मुळीच इच्छा कलामांची होत न्हवती, अश्या वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना जाण्यास मानसिक बळ दिले.ते त्यांना म्हणाले, "अबुल, तुला मोठे व्हायचे असेल, तर गावं सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून, एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण जिथे होतील. तिथे तुला जायला हवे....आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाही."असं म्हणतं त्यांनी पुढील शिक्षणासाठी त्यांना रामनाथपूरमला 'श्वार्झ'माध्यमिक शाळेत पाठविले. तिथे त्यांना इयादुराई सालोमन एक आदर्श गुरु भेटले. ते त्यांना नेहमी म्हणायचे, "आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायला हव्या, पहिली म्हणजे माणसाला  इच्छा हवी ,महत्वकांक्षा हवी ;दुसरी, तिचा द्यास घ्यायला हवा, आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा."आणि पुढील स्वप्नं पूर्ण करण्यास हिच शिकवण त्यांना प्रेरणादायी ठरली.त्यानंतर 1950मध्ये त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला तिथेही त्यांना उत्तम असे गुरु लाभले. कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला असतांना त्यांना इंग्लिश साहित्याची गोडी लागली.टॉल्स्टॉय, हार्डी, स्कॉट हे त्यांचे आवडते लेखक होते. त्याचबरोबर विज्ञान विषयात त्यांची रुची वाढायला लागली. सेंट जोसेफमध्ये बी.एससी.केल्यानंतर त्यांनी मद्रास येथील सुप्रसिद्ध अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज भरला संपूर्ण दक्षिण भारतात मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सर्वोत्तम अभियांत्रिकी कॉलेज होते. या कॉलेजचे शिक्षण महागडे असल्यामुळे वडिलांजवळ तेवढे पैसे नव्हते. तेव्हा त्यांची बहीण जोहरा हिने आपल्या सोन्याच्या बांगड्या,साखळी गहाण ठेवली आणि कलमांची फी भरली. शिक्षणासाठी केलेल्या मदतीमुळे त्यांचं मन हेलावून गेले. आणि त्याचवेळी त्यांनी मनोमन शपथ घेतली के मी माझ्या स्वतःच्या पैशातून तिच्या बांगड्या आणि साखळी  सोडून आणेल.एमआयटी मधल्या चार वर्षाच्या शिक्षणकाळात तीन प्राध्यापिकांनी त्यांच्या विचारला खरी दिशा देण्याचे काम केले.सतत न थकता ज्ञान देण्याची वृत्ती आणि विद्यार्थ्यांची बौद्धिक भूक भागवायची क्षमता त्यांच्यात होती. त्यानंतर ते बंगलोरला प्रशिक्षणासाठी राहले.प्रशिक्षण संपल्यानंतर एरोनॉटिकल अभियंता म्हणून जेव्हा ते बाहेर पडले.आणि त्यानंतर त्यांनी कधी वळून बघितलेच नाही.
        अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन केंद्रात एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे त्यांनी  प्रशिक्षण घेतले.तेथील वास्तव्यात असलेल्या अमेरिकन लोकांबद्दल त्यांच्या मनात कमालीचे कुतूहल होते. त्यांच्या मनात त्यांच्या विषयी एक आदर्श निर्माण झाला, तो बेंजमिन फ्रँकलिनच्या शब्दात त्यांनी व्यक्त केला, "ज्या गोष्टी दुःखदायक आहेत, त्यांना सामोरे जा, त्यांचा सामना करा."या विचाराप्रमाणे अमेरिकनांचा स्थायीभाव आहे . सहन करत राहण्यापेक्षा बाहेर पडण्याचे प्रयत्न करणे अमेरिकन लोकांना भावते. असं ते म्हणतं, भारतीयांमध्येही ही जिद्द असायला हवी असं त्यांना मनापासून वाटतं... ! 

         1963 मध्ये भारतातील अवकाश संशोधन संस्थेत( इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनात महत्त्वाचे कार्य करून स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रे तयार  करण्यात महत्वाची भूमिका त्यांनी पार पडली.त्यांना विक्रम साराभाई सारखे उमद्या नेतृत्व गूण असणारे आदर्श त्यांना  मिळाले.अनेक महत्वपूर्ण क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचण्या त्यांनी पार पाडल्या .त्यांचे या क्षेत्रातील कार्य अमौलिक असे आहे.

      भारत देश विकसित देशात गणला जावा त्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. विकसित देशामध्ये आज जे काही सुजलांम सुफलाम दिसते ते चमत्कार नसून त्या देशातील नागरिकांना आपले जीवन सुखकर आणि आपला देश सतत प्रगतीच्या व संपन्नतेच्या मार्गावर असावा अशी दुर्दम्य इच्छा पिढ्यानपिढ्या बाळगणे होय. असे ते म्हणत तेव्हा आपल्यालाही देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर या देशातील प्रत्येक नागरिकाने देशाला प्रगतीच्या मार्गक्रमात न्यायला हातभार लावायला हवा असे ते म्हणतं. युवाशक्ती ही देशातील एकमेव खरी संपत्ती असून आजचा तरुण युवकच आपल्या राष्ट्राला समृद्धतेचा व विकासाच्या मार्गावर नेऊ शकतो, तेव्हा युवकांनी आमूलाग्र स्वप्नं बघावी व  ती स्वप्नं कार्यन्वित होण्यास अथक प्रयत्नांची पराकाष्ठा गाठावी असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी तरुणांना दिला.

                आधुनिक ज्ञान क्षेत्राची व्याप्ती वाढवून नवनवे संशोधन आपल्या देशात व्हायला पाहिजे असे त्यांना वाटत. देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यास या देशातील प्रत्येक  तरुणांनी कायम तत्पर राहून  आपल्या उद्देशांवर आणि विधायक स्वप्नांवर विश्वास ठेऊन कार्य करायला पाहिजे असं ते म्हणतं.  प्राचीन भारत हा ज्ञानाचा समृद्ध असा भारत देश होता जिथे गणित, वैधकशास्त्र आणि खगोलशास्त्र या क्षेत्रामध्ये भारतीय बुद्धिवंतांनी अत्यंत अवघड कार्य पूर्व तपाला मग आजचा तरुण मागे का ?असा प्रश्न ते तरुणांना करतं.  इंडिया व्हिजन 2020 या दस्तएवजामध्ये या देशातील तरुणांना देशांमधील सगळ्या नद्या एकमेकांना जोडण्याची मोहीम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.जेणेकरून या देशातील काही राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होईल आर्थिकदृष्ट्या देश समृद्ध बनेल.  तरुणांच्या मनाची ताकद ही अफाट असून तरुणच असाध्य गोष्टीला साध्य करू शकतो, असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे तरुण विद्यार्थ्यांना विविध विद्यालयात कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करीत होते.
          त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात महत्वपूर्ण अश्या ग्रंथाची निर्मिती केली जे अनेकांना जीवनाची नवी वाट दाखवू शकते त्यामध्ये,'विंग्ज ऑफ फायर', 'इग्नायटेड माईंड्स', 'अनलियिंग द पॉवर विदिन इंडिया ', 'इंडिया फॉर मलेनियम 'इत्यादी अनेक ग्रंथ प्रसिद्ध व2020',' ए व्हिजन वाचनआहेत.
       तर 'अग्निपंख' नावाचा माधुरी शानभाग यांचा अनुवादित चरित्रगंथ कलामांच्या संपूर्ण जीवनातील कारकिर्दीवर व  व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा आहे. जो जीवनात प्रत्येकांनी एकदातरी वाचावा;असं मला वाटतं.

      ए. पी. जे. अब्दुल कलाम तरुणांसाठी आदर्श असं व्यक्तिमत्व होतं.त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत देशाप्रती मौलिक असे कार्य केले.त्यांच्या व्याख्यानातून अनेकांना नवे विचार आत्मसात करण्याचे बळ मिळत. अशी ही महान विभूती अनेकांना आदर्श ठरावी अशी होती.त्यांच्या अचानक जाण्यामुळे देशाने एक मौल्यवान हिरा गमावला आहे.त्यांचे मौलिक कार्य हा देश कधीही विसरू शकणार नाही.आपल्या  शेवटच्या श्वासापर्यंत ते समाजाला कुतार्थ भावनेने भरभरून विचार देत राहले. अश्याच एका  प्रसंगी शिलॉंग  येथे आय आय एम कार्यक्रमात व्याख्यान देत असताना त्यांची  अचानक तब्येत बिघडली व ते तिथे कोसळले व त्यातच त्यांनी शिलॉंग येथील  रुग्णालयात 27 july 2015 रोजी अखेरचा श्वास घेतला. अशा या महान विभूतीला त्यांच्या स्मृती दिनानिमित्य त्रिवार अभिवादन !
   

प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
7420850376

   

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?