सेल्फीचं विनाशकारी भूत !

      

            जगाच्या पाठीवर भारतदेश हा तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जातो. तरुणाई म्हणजे या देशाचे आधारस्तभं!या देशाचा गौरव! अनेक नवनवीन शोध, उत्तुंग ध्येय पूर्ण करण्याची जिज्ञासा, अनेकांना  कठीण प्रसंगात संकटातून  बाहेर काढण्याची अलौकिक उर्मी याच सळसळत्या रक्तात असते. अनेक स्वप्नं साकार करण्याचं हे वय !पण दुर्दैवं असं की यशाचे उत्तुंग शिखरे पार करण्याची क्षमता असणारा आजचा तरुण सेल्फी, स्टंटबाजी व समुद्राच्या ठिकाणी आपल्या जीवाला धोक्यात टाकून स्वत:च्या  आत्मनाशास कारणीभूत ठरत आहे.तरुणांच्या अश्या वाढत्या मृत्यूच्या घटनेमुळे अवघ समाजमन हळहळतं तर कित्येक कुटुंब उध्वस्त झालेले आहेत.

           देशाच्या इतिहासात अनेक तरुणांना प्रेरणा मिळावी असे विचार या पावन भूमीत रुजले असतांना आजचा तरुण भरकटलेल्या स्थितीत आढळून येत आहे. तरुणाईच्या जोशात त्याने आपल्या जीवालाच कुठे तरी धोक्यात टाकलेल्याचे दिसून येत आहे. सेल्फीचं  विनाशकारी भूत सध्या तरुणाईच्या मनामनावर अधीराज्य गाजवीत असून ही अतिशय चिंताजनक बाब सोशल मीडियाच्या जगात वावरतांना आज स्मार्ट फोन प्रत्येकाची गरज झालेली असून त्याला टाळता येणे शक्य नाही.पण 'अती तिथे माती ' या नुसार  कोणत्याही गोष्टीचा माणसाने अतिरेक केला की त्याला त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात हे  नक्की !
          स्मार्ट फोन अनेकांना वरदान रुपी ठरू शकतो. कारण यात अनेक महत्वपूर्ण घटनांचा शोध आपण घेऊ शकतो, संकटात सापडलेला व्यक्ती याच माध्यमाने इतरांशी संपर्क साधू शकतो. संपूर्ण जगातील माहितीचा तो एक खजिना आहे.  कितीतीरी वाईट गुन्हेगारांचा शोध लावण्यास मोबाईल हा महत्वपूर्ण ठरलेला आहे.विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी वर्गापासून ते पेपराची तयारी करुन घेण्यापर्यंतचे सर्वच उपाय यात आहे. पण शोकांतिका अशी की या साधनाचा उपयोग चांगल्या कामासाठी कमीच केला जातो. त्यामुळे स्मार्ट फोन
युवकांसाठी वरदान नसून श्राप ठरत आहे.सातत्याने फोनचे होणारे स्फोट,ड्रायविंग करतांना फोनवर बोलण्यामुळे होणारे अपघात, सेल्फी काढण्याचा नादात गेलेले नाहक जीव याची संख्या दिवसेनदिवस वाढताना दिसून येत आहे.
               अशीच एक दुर्दैवी घटना 17तारखेला रविवारी दुपारी पालघर मधील केळवे या पर्यटन स्थळी घडली. अवघ्या पंधरा ते  पंचवीस वयोगटातील हे युवक तिथे फिरायला गेले असता,पाण्यात जाण्याचा मोह त्यांना आवरू शकला नाही.आणि यातच त्यातील चार तरुणांचा समुद्रात बडून दुर्दैवी अंत झाला.धोकादायक असलेल्या खाडीत सूचनेचं फलक लावलं असतांनाही त्या सूचनेला झुंगारत हे तरुण त्याठिकाणी पोहायला गेले व हिच  तरुणाईतील बेफिकरी त्यांच्या जीवावर बेतली असं म्हणायला हरकत नाही.19जून मंगळवारच्या रात्री अशीच एक घटना माथेरान येथे घडली.दिल्लीतील सरिता चौव्हाण ही आपल्या कुटूंबासह फिरायला गेली असता,तिला फोटो मोह आवरता आला नाही आणि त्याच  उत्साहात  माथेरानच्या 1300फूट खोल  दरीत कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.आपल्या पती व दोन लहानग्या मुलांसमोर सरिता या जगाला कायमची पारखी झाली. मागील वर्षात 9जुलै 2017रोजी  नागपुरातील आशीर्वाद नगरातील 10कॉलेज तरुणांचा ग्रुप मंगरूळ येथे तलावावर गेले असता. तलावाच्या मधभागी जावून होडीवर उभे होत, सेल्फी घेण्याचं धाडस त्यांच्या जीवावर बेतलं व त्यात सात तरुणांचा नाहक बळी गेला.1फेब्रुवारी 2016ला मुंबईच्या दोन तरुणींना आपला जीव गमवावा लागला. अश्या एक नाही तर कित्येक घटना आपल्या समोर रोजच येत आहे. सोशल मीडियाच्या आहारी जात,सेल्फीचे हे विनाशकारी भूत अनेकांचे जीव घेण्यास कारणीभूत ठरत आहे.'विनाशकाले  विपरीत बुद्धी 'असे आपण म्हणतो... त्याचाच प्रत्यय आपल्याला येत आहे.

         फॅशन च्या दुनियेत जीवावर बेतणारी स्टंटबाजी, सेल्फी आणि पाण्यात केलेली  मोज मस्ती हे सर्वच तरुणाईला अधःकाराच्या गर्तेत घेऊन जाण्यास कारक ठरत आहे.उंच कडेकपारी,  धबधबा, पर्वत, उंचीवरील गडकिल्ले,समुद्राच्या पर्यटनीय स्थळावर  फिरायला गेलं असता अनेकांना सेल्फी चा मोह आवरू शकतं नाही पण ही आवड आपल्या जीवावर बेतणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचं आहे.पण ती काळजी न घेता आजची तरुणाई आपल्या स्पुर्ती व अविवेकाच्या भरात आपले जीव गमवण्यास कारणीभूत ठरत आहे. ही सत्यस्थिती आपल्याला डावलता येणार नाही.म्हणूनच आज नैसर्गिक मृत्यूपेक्षा आपल्या हाताने ओढवून घेतलेल्या मृत्यूचे प्रमाण दिवसेनदिवस वाढतच चाललेला आहे. ऐन तरुणाईत मुलांच्या यशस्वितेचे स्वप्नं बघत असतांना आपल्या तरुण मुलाचा दुर्दैवी अंत काही अभागी आईवडिलांना उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं,यापेक्षा त्यांच्या जीवनातलं कोणतं मोठं दुःख असू शकते.

          जगात कोणतीही अनमोल गोष्ट असेल तर ते म्हणजे आपलं जीवन. त्यापेक्षा अधिक मौल्यवान काहिच असू शकतं नाही. मानवी जीवनाचं मोल्य लक्षात घेत ते जाणीवपूर्वक जगणं गरजेचं आहे. पण असं होतांना दिसत नाही.तरुण विद्यार्थ्यांनी नैराश्यामुळे केलेल्या आत्महत्या, अपधातामुळे जाणारे तरुणांचे जीव आणि सेल्फीच्या नादात नाहक गेलेले तरुणांचे जीव, याचा आकडा बघतला तर तो काळजाला घाव घालणारा आहे. नुकत्याच केलेल्या एक सर्वेक्षणानुसार जगभर सेल्फी काढण्याच्या कारणाने मृत्यू होणाऱ्या ऐकून संख्येपैकी अर्ध्यापेक्षा अधिक संख्या भारतीयांची आहे. यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की सेल्फी घेणे आपल्यासाठी किती महागात पडू शकते. त्यामुळे अनेक पर्यटनस्थळी अवघड ठिकाणी 'नो सेल्फी जोन 'घोषित केलं आहे.त्यामुळे आता आपण अश्या ठिकाणी सावध असायला पाहिजे.

          तारुण्याचं सळसळत रक्त अनेकांना प्रेरणादायी ठरू शकते इतकी अलौकिक शक्ती, सामर्थ, प्रचंड आत्मविश्वास आजच्या युवा पिढीत असून तोच या राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकतो. दिवसरात्र देशाची सेवा करणारा तरुण जवान याचे जिवंत उदाहरण आहे.देशात एकात्मता निर्माण करून जातीय सलोखा निर्माण करण्याचं बळ तरुणांच्याच  मनगटात आहे. तेव्हा ती शक्ती, ते बळ, ती ऊर्जा, तो सत्साह त्याने चांगल्या कार्यात खर्च केला तर त्यांच्या जीवनाला एक नवा अर्थ प्राप्त होऊ शकतो . युवांनी जर एकजुटीने एकत्र येऊन कार्य केले तर या देशाचे नावं सुवर्ण अक्षरात कोरले जाऊ शकते. देशाप्रती, समाजाप्रती, कुटूंबाप्रती आपली जवाबदारी लक्षात घेत. आपला अमूल्य जीव आपण जपला पाहिजे.सोशल मीडियाच्या व सेल्फीच्या अधिक नादात न लागता आपलं अमूल्य जीवन संकटात सापडणार नाही याची काळची प्रत्येक तरुणांनी घ्यायला हवी !
             जीवनात पर्यटनाच्या अनेक स्थळाला भेट देणं गरजेचं आहे. नैसर्गिक घटकांचा मनमुराद आनंद घ्यायला कोणाला आवडणार नाही.. पण तेवढंच  जीवाला जपणं सुद्धा महत्वाचं आहे. आनंद साजरा करतांना आपल्या बरोबरच्या मित्रांना सावधतेने इशारे करीत...जास्त पाण्याच्या ठिकाणी अधिक दक्ष राहणं महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी सावधेनतेचे फलक लावले जातात अश्या ठिकाणी जावू नये. कुठल्याही पाण्याच्या ठिकाणी गेले असता सुरक्षतेचे साधने  आपल्याजवळ असायला हवे... पाण्याच्या ठिकाणी बोटिंग करतांना स्वरक्षक जॉकेट चा वापर करावा.खोल पाण्याच्या ठिकाणी किंवा अती अवघड ठिकाणी सेल्फी काढण्याचा नाद टाळावा...मध्यपान करीत ड्रायविंग करू किंवा बोटिंग करू नये.खोल दरी चढतांना किंवा फोटो काढतांना अधिक दक्षता घ्यायला हवी... अशी खबरदारी घेतली असता आपल्याला संभाव्य धोके टाळता येतील.शिवाय निसर्गाचा मनमुराद आनंद सुद्धा घेता येईल.

प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
7420850376

            

             

       

              

             
 
                
 
          

Comments

  1. प्रथमतः अभिनंदन... स्वतः चा ब्लॉग तयार केलात... आणि लेख म्हणाल तर उत्तमच....खरचं तरूणाईच्या या सेल्फी व्यसनापाई नाहक जीव गमवावा लागत आहे. चांगल्या कामापेक्षा अवांतर बाबींसाठी मोबाईलचा अधिक वापर होत आहे. हल्ली पालकही खोट्या प्रतिष्ठेपोटी मुलांना महागडे मोबाइल घेऊन देत आहे. तसे पाहिले तर आज संपर्कात राहण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. पण एकदा शाळकरी मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर ते त्याचा वापर कसा करतात, इंटरनेट वर काय पाहतात, कुणाच्या संपर्कात असतात... याबाबत पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे.. कारण इंटरनेटवर ईसीस सारख्या संघटनांचे टार्गेट अशी अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थीच असतात. तेव्हा मोबाईल वापरताना तो जास्तीत जास्त चांगल्या कामासाठी कसा वापरला जाईल, याची दक्षता घेतली पाहिजे.... बाकी एकदम आत्मपरीक्षण करायला लावणारा असाच लेख आहे.....

    ReplyDelete
  2. प्रथमतः अभिनंदन... स्वतः चा ब्लॉग तयार केलात... आणि लेख म्हणाल तर उत्तमच....खरचं तरूणाईच्या या सेल्फी व्यसनापाई नाहक जीव गमवावा लागत आहे. चांगल्या कामापेक्षा अवांतर बाबींसाठी मोबाईलचा अधिक वापर होत आहे. हल्ली पालकही खोट्या प्रतिष्ठेपोटी मुलांना महागडे मोबाइल घेऊन देत आहे. तसे पाहिले तर आज संपर्कात राहण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. पण एकदा शाळकरी मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर ते त्याचा वापर कसा करतात, इंटरनेट वर काय पाहतात, कुणाच्या संपर्कात असतात... याबाबत पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे.. कारण इंटरनेटवर ईसीस सारख्या संघटनांचे टार्गेट अशी अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थीच असतात. तेव्हा मोबाईल वापरताना तो जास्तीत जास्त चांगल्या कामासाठी कसा वापरला जाईल, याची दक्षता घेतली पाहिजे.... बाकी एकदम आत्मपरीक्षण करायला लावणारा असाच लेख आहे.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?